'भारत आमची वीज विकत घेईल याची शाश्वती नाही'; नेपाळच्या पंतप्रधानांचा दावा

“आम्हाला विकास उपक्रमांना गती देण्यासाठी आणि COP-26 मध्ये केलेल्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी देशातील (Nepal) जलविद्युत शक्ती वाढवणे आवश्यक आहे.''
Prime Minister Sher Bahadur Deuba
Prime Minister Sher Bahadur DeubaDainik Gomantak
Published on
Updated on

नेपाळचे (Nepal) पंतप्रधान शेर बहादूर देउबा (Sher Bahadur Deuba) यांनी मंगळवारी विकासकामांसाठी देशांतर्गत जलविद्युत स्रोताचा वापर वाढविण्याच्या गरजेवर भर दिला असून, भारताला अतिरिक्त वीज मिळेल याची शाश्वती नसल्याचे सांगितले आहे. नेपाळ इंडिपेंडेंट पॉवर जनरेशन असोसिएशन (IPPAN) च्या 19 व्या आणि 20 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करताना, देउबा म्हणाले, “आम्हाला विकास उपक्रमांना गती देण्यासाठी आणि COP-26 मध्ये केलेल्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी देशातील जलविद्युत शक्ती वाढवणे आवश्यक आहे.

"भारत आमची अतिरिक्त वीज विकत घेईल याची कोणतीही शाश्वती नसल्यामुळे, आम्ही अधिक इलेक्ट्रिक वाहने वापरुन आणि गॅस हिटरच्या जागी इलेक्ट्रिक स्टोव्ह वापरुन देशातील जलविद्युत उर्जेचा घरगुती वापर वाढवला पाहिजे," असं देउबा नेपाळबद्दल म्हणाले. जीवाश्म इंधनाचा वापर कमी करा, पंतप्रधान पुढे म्हणाले, "आमच्या देशाला आजकाल हवामान बदलाच्या परिणामांचा (Climate Change) सामना करावा लागत असून हिवाळ्यातही आपल्याला पूर आणि भूस्खलनाचा सामना करावा लागत आहे." नियंत्रण ठेवण्यासाठी नेपाळने दक्षिण आशियामध्ये आघाडीची भूमिका बजावली पाहिजे असही ते म्हणाले.

Prime Minister Sher Bahadur Deuba
अमेरीकेला टाकले मागे, चीन बनले जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्र!

नेपाळने आपली अतिरिक्त वीज विकण्याची परवानगी दिली होती

तत्पूर्वी, महिन्याच्या सुरुवातीला, नेपाळ आपली अतिरिक्त वीज भारताला स्पर्धात्मक दराने विकणार असल्याची बातमी आली होती. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, भारताने शेजारील देशाला भारतीय पॉवर एक्सचेंज मार्केटमध्ये विजेचा व्यापार करण्यास परवानगी दिली आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एनर्जी एक्सचेंजने नेपाळला परवानगी दिली. याबाबत नेपाळकडून बरेच प्रयत्न करण्यात आले. नेपाळ विद्युत प्राधिकरण (NEA) आपली अतिरिक्त वीज विकण्याच्या स्थितीत पोहोचल्याचे सांगण्यात आले.

पहिल्या टप्प्यात, 39 मेगावॅट विजेचा भारतीय ऊर्जा विनिमयावर व्यापार करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यापैकी 24 मेगावॅट एनईएच्या मालकीच्या त्रिशूली जलविद्युत प्रकल्पातून आणि 15 मेगावॅट देवीघाट पॉवर स्टेशनमधून निर्माण झाली आहे. नेपाळच्या ऊर्जा, जलसंपदा आणि पाटबंधारे मंत्रालयाच्या हवाल्याने एका अहवालात म्हटले आहे की, भारताच्या मान्यतेनंतर दोन्ही देशांमधील वीज व्यापार नव्या टप्प्यात पोहोचला आहे. मंत्रालयाचे संयुक्त प्रवक्ते गोकर्ण राज पंथा यांनी सांगितले की, नेपाळ विद्युत प्राधिकरण आता आपली वीज विकण्यासाठी इंडियन एनर्जी एक्सचेंजवर दररोज होणाऱ्या लिलावात सहभागी होऊ शकेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com