Marriage
MarriageDainik Gomantak

South Korea मध्ये अजब पेच, तरुणांना लग्न करण्यात रस नाही; 'या' रेकॉर्डमुळे वाढली चिंता

South Korea: लग्न होणे हा प्रत्येक तरुणासाठी आनंदाचा क्षण असतो. पण असाही एक देश आहे, जिथे तरुणांना लग्न करण्यात रस नाही. ताजी आकडेवारी याची साक्ष देते.
Published on

South Korea: लग्न होणे हा प्रत्येक तरुणासाठी आनंदाचा क्षण असतो. पण असाही एक देश आहे, जिथे तरुणांना लग्न करण्यात रस नाही. ताजी आकडेवारी याची साक्ष देते. हे आकडे धक्कादायक आहेत.

हा देश दक्षिण कोरिया आहे, जिथे गेल्या वर्षी लग्न करणाऱ्यांच्या संख्येत विक्रमी घट झाली होती. हा आकडा सरकारची डोकेदुखी वाढवणारा आहे. सर्वात कमी जन्मदर असलेल्या देशात ही आकडेवारी अतिशय अस्वस्थ करणारी आहे.

स्टॅटिस्टिक्स कोरियाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी सुमारे 192,000 जोडप्यांचे लग्न झाले, जे 2012 च्या दशकापूर्वीच्या तुलनेत 40 टक्के कमी आहे. त्यादरम्यान तीन लाख 27 हजार जोडपी लग्न बंधनात अडकली होती.

सरकारने (Government) 1970 च्या दशकात विवाहाच्या नोंदी ठेवण्यास सुरुवात केली. त्यानंतर एका वर्षात सर्वात कमी विवाह करण्याचा हा विक्रम आहे.

Marriage
North Korea Army Parade: किम जोंग-उनची बायको त्याच्यापेक्षाही वरचढ, गळ्यातला 'मिसाईल नेकलेस' देतोय खास मॅसेज

दक्षिण कोरिया: विवाह कमी होण्याची कारणे कोणती?

दक्षिण कोरियाची (South Korea) लोकसंख्या आणि विवाह न होण्यामागे अनेक कारणे आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की, तरुण लग्न करु इच्छित नाहीत कारण दक्षिण कोरियाच्या अति-स्पर्धात्मक समाजात मुलांचे संगोपन करणे आणि घर खरेदी करणे ही कठीण कामे आहेत.

हा अनोखा विक्रम दक्षिण कोरियात पहिल्यांदाच झाला

दक्षिण कोरियामध्ये पहिल्यांदाच, लग्नाच्या वेळी पुरुषांचे सरासरी वय 33.7 वर्षांपर्यंत पोहोचले आहे, जे विक्रमी उच्च आहे. लग्नासाठी वधूंचे वयही 31.3 वर्षांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. पुरुषांचे लग्नाचे सरासरी वय 1.6 वर्षे आणि महिलांचे 1.9 वर्षांनी वाढले आहे.

Marriage
North Korea: उत्तर कोरियात लाल लिपस्टिकवर बंदी, जाणून घ्या किम जोंग उन नवा फर्मान

नवीन आकडेवारी अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा दक्षिण कोरिया जन्मदरात सातत्याने घट होत आहे. गेल्या वर्षी केवळ 249,000 मुलांचा जन्म झाला होता. दरवर्षी मुलांच्या जन्मदरात घट होताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com