नेदरलँडमधील (Netherlands) नागरिकांची गणना जगातील सर्वात उंच लोकांमध्ये केली जाते. परंतु तिथल्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या ताज्या आकडेवारीवरुन असे दिसून आले आहे की, सरासरी डच व्यक्तीची उंची आता कमी होत आहे. या बदला बद्दल शास्त्रज्ञ आश्चर्य व्यक्त करत आहेत. झाले आहेत. जरी डच पुरुषांची उंची 182 सेंटीमीटर आणि स्त्रियांची सुमारे 167 सेंटीमीटर असली तरीही जगातील इतर देशांच्या तुलनेत उत्तम आहे.
1980 पासून सतत बदल
दरम्यान, अभ्यासानुसार हा बदल काही दिवसात झाला अस काही नाही, 1980 पासून नेदरलँडच्या लोकांची उंची 'कमी होत आहे'. सरकारी आकडेवारीनुसार, 2001 मध्ये जन्मलेल्या डच स्त्रिया 1980 मध्ये जन्मलेल्या स्त्रियांपेक्षा सरासरी 1.2 सेमीपेक्षा कमी आहेत, तर पुरुषांची उंची सुमारे 1 सेमी कमी झाली आहे.
बाहेरुन येणाऱ्या लोकांची उंची कमी आहे का?
तज्ञ असेही म्हणतात की, उंची कमी होण्याचे आकडे त्या लोकांमध्ये जास्त आहेत, जे अलीकडच्या काळात बाहेरुन येथे स्थायिक झाले आहेत.
लहान उंचीचे कारण काय?
उंचीबद्दल केलेल्या अभ्यासात काही तथ्य समोर आली आहेत, ते व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम करणार आहेत. 2007 च्या आर्थिक संकटाप्रमाणे इथल्या लोकांच्या आरोग्यावरही परिणाम झालेला दिसून आला आहे. आर्थिक संकटाव्यतिरिक्त, लोकांमध्ये अनहेल्दी फूडच्या वाढत्या वापरामुळे आरोग्यावरही परिणाम झाला आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की जंक फूडचा ट्रेंड आणि नैसर्गिक आहाराचा अभाव देखील लोकांच्या उंचीवर परिणाम करत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.