अमेरिका देणार भारताला मोठ्ठालं पॅकेज, 'रशियापासून दूर' ठेवण्याची चर्चा सुरु

अमेरिका भारताला मोठे लष्करी पॅकेज (Military Package) देण्याची तयारी करत आहे.
Joe Biden
Joe BidenDainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिका भारताला मोठे लष्करी पॅकेज (Military Package) देण्याची तयारी करत आहे. संरक्षण क्षेत्रात भारताचे रशियावरील अवलंबित्व पाहता राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे पॅकेज तयार करत आहेत. ब्लूमबर्गच्या मते, अमेरिकेला भारतासोबतचे संरक्षण संबंध अधिक दृढ करायचे आहेत. त्याचबरोबर भारताचे रशियन शस्त्रांवरील अवलंबित्व कमी करायचे आहे. याच साठी पॅकेजमध्ये $500 दशलक्षची आर्थिक मदत भारताच्या लष्करी वापरासाठी (परदेशी लष्करी वित्तपुरवठा) असू शकते. (The US to give $ 500 million packages to India prepares to keep PM Modi away from Russia)

मिळालेल्या माहितीनुसार, या पॅकेजमुळे इस्रायल (Israel) आणि इजिप्तनंतर एवढी मोठी मदत मिळवणारा भारत दुसरा देश बनेल. मात्र, हा करार कधी जाहीर केला जाईल किंवा त्यात कोणती अत्याधुनिक संरक्षण प्रणाली समाविष्ट केली जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भारताला दीर्घकालीन सुरक्षा सहयोगी बनविण्याच्या राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. युक्रेनवर हल्ला केल्याबद्दल भारताने अद्याप रशियावर टीका केलेली नाही, मात्र असे असतानाही अमेरिका आपले प्रयत्न कमी करु इच्छित नाही.

Joe Biden
इस्लामिक देशांच्या संघटनेला भारताने फटकारले, ''पाकिस्तानी प्रचार करु नका''

दुसरीकडे, वॉशिंग्टन भारताकडे विश्वासू भागीदार म्हणून पाहत आहे. भारत सरकार अत्याधुनिक संरक्षण प्रणाली मिळवण्यासाठी फ्रान्ससोबत (France) काम करत आहे.

याशिवाय, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मते, भारत हा रशियन शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. गेल्या दशकात भारताने (India) अमेरिकेकडून (America) सुमारे 4 अब्ज डॉलर्सची आणि रशियाकडून 25 अब्ज डॉलरची शस्त्रे खरेदी केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com