तालिबानचे सरकार (Taliban Government) अफगाणिस्तानात (Afghanistan) स्थापन झाल्यानंतर आता दहशतवादी संघटना पुन्हा डोकेवर काढण्याची भिती वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अमेरिकेने (America) अलकायदा आणि ISIS च्या धोका लक्षात घेता त्यांना तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. अफगाणिस्तानातून सैन्य माघारीनंतर या आठवड्यात अमेरिकेचे लष्करी अधिकारी ग्रीसमध्ये नाटो समकक्षांसोबत बैठक करणार आहेत. या बैठकीचा अमेरिका आणि क्षेत्रासाठी दहशतवादी संघटनांकडून (Terrorist Organizations) असलेला संभाव्य धोका पाहता सहकार्य वाढवणे, गुप्तचर आणि इतर बाबींची देवाणघेवाण करणे हा मुख्य हेतू असणार आहे.
याबाबत बोलताना जॉईंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष मिलिटरी जनरल मार्क मिल्ले म्हणाले, नाटोच्या (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) सदस्य देशांचे संरक्षण प्रमुख अफगाणिस्तानातून युतीचे सैन्य पूर्णपणे माघारीघेतल्यानंतर याबाबत पुढे काय पावले टाकायची यावर लक्ष केंद्रित करतील. तालिबान सरकारमुळे दहशतवादी संघटना अल कायदा आणि आयएस पुन्हा एकदा डोके वर काढू शकतात. यामुळे अमेरिकेसह जगातील देशांना या संघटनांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. अनेक गुप्तचर अहवालांमध्ये या गोष्टी समोर आल्या आहेत.
अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन आणि अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी इशारा दिलेल्या माहितीनुसार, अल कायदा किंवा इस्लामिक स्टेट अफगाणिस्तानात पुन्हा पाय आपले पाय रोवू शकतात. पुढील एक ते दोन वर्षे अमेरिकेला धोका असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. अमेरिकेच्या लष्कराने म्हटले आहे की, दहशतवादी कारवायांवर नजर ठेऊन त्यांचा बिमोड केला जाऊ शकतो. तसेच गरज पडल्यास अफगाणिस्तानातील दहशतवादी तळांवर इतर देशांच्या लष्करी तळांवरून कारवाई केली जाऊ शकते.
अधिकार्यांनी स्पष्ट केले की, आखाती देशांच्या लष्करी तळांवरील टोही विमानांची लांब पल्ल्याची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत, अफगाणिस्तानच्या जवळील देशांशी लष्करी तळांशी संबंधित करार, एकमेकांच्या हद्दीत विमाने उडवण्याचा अधिकार देणे, गुप्तचर माहिती शेअर करणे यावर देखील चर्चा करता येऊ शकते. मागील काही महिन्यांत लष्करी तळांबाबत कोणताही करार झालेला नाही. मार्क मिल्ले म्हणाले की, ते याबाबत एकमेकांशी या मुद्द्यांवर चर्चा करतील. असे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रीसचे संरक्षण मंत्री निकोलस पनागियोटोपौलोस म्हणाले, यामध्ये प्रमुख्याने अफगाणिस्तानमध्ये राहणारे लोक सुरक्षित राहतील आणि त्यांना कोणताही मानवतावादी संकटाचा त्रास होणार नाही. याची खात्री करुन घेतली पाहिजे. असे त्यांनी यावेळी नमूद केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.