अफगाण सैन्याचं तालिबानच्या हल्ल्याला सडेतोड उत्तर !

तालिबानी अतिरेक्यांनी यापूर्वीच तखर प्रांतातील किमान सहा जिल्हे ताब्यात घेतलेले आहेत आणि तालुकान शहर प्रांतीय राजधानी ताब्यात घेण्यासाठी निरंतर झुंज देत आहेत.
The Taliban's attack on the town of Talukan was back by the Afghan army
The Taliban's attack on the town of Talukan was back by the Afghan army Dainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानच्या(Afghanistan) उत्तरेकडील ताखार प्रांताची राजधानी असलेल्या तालुकान(Taleqan) शहरावर तालिबानने(Taliban) केलेला हल्ला अफगाणि लष्कराने(Afghan Army) हणून पडला आहे. प्रांतीय सरकारचे प्रवक्ते हमीद मुबारिझ या कारवाई नंतर म्हणाले की सैन्याने केलेल्या जबाबाच्या कारवाईत जखमी झालेल्या तब्बल दोन डझनहून अधिक मृतदेहांना सोडून तालिबानी दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला आहे .

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे तालिबानी दहशतवाद्यांनी एकाच वेळी तालुकान शहरावर हल्ला केला होता परंतु सुरक्षा दलाच्या जवाबी कारवाईने दहशतवाद्यांना तेथून पळ काढण्यास भाग पाडले. दरम्यान, उत्तर तखार प्रांतातील सैन्य अधिकारी अब्दुल रझाक यांनी शिन्हुवा वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की सैन्याने कमीतकमी 18 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा केला असून तालुकान शहरात बंडखोर जमीन मिळविण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. या हल्ल्यात अफगाणिस्तानचे तीन सैनिक जखमी झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

The Taliban's attack on the town of Talukan was back by the Afghan army
कोरोनानंतर चीनमध्ये पुन्हा नवं संकट

तालिबानी अतिरेक्यांनी यापूर्वीच तखर प्रांतातील किमान सहा जिल्हे ताब्यात घेतलेले आहेत आणि तालुकान शहर प्रांतीय राजधानी ताब्यात घेण्यासाठी निरंतर झुंज देत आहेत. सुरक्षा दलांनी गेल्या काही दिवसांत कुंदुजची प्रांतीय राजधानी कुंदुज शहर आणि बद्दाखानची प्रांतीय राजधानी फैजाबादवरील तालिबानी हल्ले देखील रोखले.

विशेष म्हणजे अमेरिकन आणि नाटो देशांची सैन्ये अफगाणिस्तानातून माघार घेत आहेत. अशा परिस्थितीत तालिबान पुन्हा एकदा अफगाणिस्तान आपले पाय रोवू पाहत आहे आणि पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे, परंतु अफगाण सुरक्षा दलातील सैनिक सतत तालिबान्यांना धडा शिकवत आहेत. लष्कराच्या कठोर कारवाईमुळे आतापर्यंत बंडखोरांच्या बर्‍याच योजनांना अपयश आले आहे आणि तालुकानमधील शहरावरील हल्ल्यात आजचा आणखीन एक हल्ला जोडला गेला आहे.

दरम्यान तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत तालिबानबरोबर झालेल्या कराराचा भाग म्हणून अफगाणिस्तानातून परदेशी सैन्यांची माघार घेण्यात येत आहे. ऑगस्टच्या अखेरीस सर्व परदेशी सैन्य पूर्णपणे देशातून काढून घेण्यात येईल, अशी पुष्टी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी यापूर्वीच केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com