राष्ट्रपती कोविंद कॅरेबियन देशांच्या दौऱ्यावर, '.... इंडिया ड्राइव्ह भारत मार्ग'

राष्ट्रपती राम नाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांनी सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सचे पंतप्रधान राल्फ गोन्साल्विस यांच्या उपस्थितीत किंग्सटाउनमधील काल्डर रोडचे 'इंडिया ड्राइव्ह-भारत मार्ग' असे नामकरण केले आहे.
President Ram Nath Kovind
President Ram Nath Kovind Dainik Gomantak
Published on
Updated on

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सचे पंतप्रधान राल्फ गोन्साल्विस यांच्या उपस्थितीत किंग्सटाउनमधील काल्डर रोडचे 'इंडिया ड्राइव्ह-भारत मार्ग' असे नामकरण केले आहे. यादरम्यान ते (President Ram Nath Kovind) म्हणाले की, 'सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्ससोबत आमची विकासात्मक भागीदारी वैश्विक बंधुतेच्या भावनेवर आधारित आहे. मी तुम्हा सर्वांना भारताच्या आर्थिक विकासात सहभागी होण्याचे आवाहन करतो.' (The road was renamed India Drive Bharat Marg while President Ramnath Kovind was on a tour of the Caribbean)

दरम्यान, राष्ट्रपती कोविंद (President Ram Nath Kovind) यांनी गुरुवारी सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सच्या सर्वोच्च नेतृत्त्वाची भेट घेतली. माहिती तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, पर्यटन आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये भागीदारी वाढवण्यावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले होते. राष्ट्रपती कोविंद यांनी गव्हर्नर जनरल डेम सुसान डोगन आणि सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सचे पंतप्रधान राल्फ गोन्साल्विस यांची भेट घेतली. राष्ट्रपती कार्यालयाने ट्विट करत म्हटले की, आम्ही माहिती तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, पर्यटन आणि संस्कृती आणि बहुपक्षीय मंचांवर सहकार्य कसे मजबूत करावे यावर चर्चा केली आहे.

President Ram Nath Kovind
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन दक्षिण कोरियात दाखल

देशाच्या संसदेलाही संबोधित करतील

दोन्ही देशांनी माहितीची देवाणघेवाण आणि कर संकलनात मदत यासह दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. राष्ट्रपती कोविंद पत्नी सविता कोविंद यांच्यासोबत या दौऱ्यावर आहेत. सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सला कोणत्याही भारतीय राष्ट्रपतीची ही पहिलीच भेट आहे. राष्ट्रपती कोविंद या देशाच्या संसदेलाही संबोधित करणार आहेत. सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स हे भारताचे महत्त्वाचे भागीदार आहेत. दोन्ही देश संयुक्त राष्ट्र (United Nations) सुरक्षा परिषदेचे कायमस्वरुपी सदस्य नाहीत, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

President Ram Nath Kovind
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन रशियावरील निर्बंध करणार जाहीर

तसेच, जमैकाला भेट दिल्यानंतर राष्ट्रपती कोविंद इथे पोहोचले आहेत. जमैकाच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीलाही त्यांनी संबोधित केले. ते म्हणाले की, जमैकाने भारतीयांचे मनापासून स्वागत केले आहे. इथे भारतीयांचे अस्तित्व केवळ राजकारणातच नाही तर व्यवसाय, संगीत, खेळ, कपडे आणि खाद्यपदार्थांमध्येही दिसून येते. राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, राष्ट्रपती कोविंद हे त्यांचे जमैकन समकक्ष, गव्हर्नर-जनरल पॅट्रिक ऍलन यांनी आयोजित केलेल्या मेजवानीलाही उपस्थित होते.

त्याच वेळी, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी जमैकामध्ये (Jamaica) सांगितले की, ''कॅरिबियन देशात शिक्षण आणि व्यवसायाच्या क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी भारत जमैकासोबत भागीदारी करण्यास आणि आपली तांत्रिक कौशल्ये, ज्ञान आणि कौशल्य सामायिक करण्यास तयार आहे.'' दोन्ही राष्ट्रांमधील परस्पर सहकार्य फायदेशीर ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com