रशिया-युक्रेन यांच्यात मागील तीन महिन्यांपासून युध्द सुरु आहे. युध्द थांबायचं नाव घेत नसताना दुसरीकडे जगभरातील अनेक देशांची अर्थिक स्थिती खलावत चालली आहे. श्रीलंकेसारख्या देशात तर आर्थिक स्थितीचे बारा वाजले आहेत.
यातच मंगळवारी पाकिस्तानी रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरने अधिक मजबूती पकडली आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य 197 वर पोहोचले. पाकिस्तानची वाढती निर्यात आणि परकीय गंगाजळीची विक्रमी घट हे याचे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले जात आहे. फॉरेक्स असोसिएशन ऑफ पाकिस्तान (FAP) च्या मते, ग्रीनबॅक आदल्या दिवशीच्या 196.50 रुपयांच्या बंदच्या तुलनेत सकाळी 10:15 च्या सुमारास 1.10 रुपयांनी वाढून 197.60 रुपयांवर गेला.
FAP डेटा दर्शवितो की, मंगळवारी ग्रीनबॅक Rs 196.50 वर बंद झाला. डॉनच्या अहवालात स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचा (Pakistan) समापन दर 195.74 रुपये आहे. मंगळवारच्या दुसर्या डॉनच्या अहवालात स्पष्टपणे सांगण्यात आले की, 2022-23 या आर्थिक वर्षात डॉलरने (Dollars) पाकिस्तानी रुपयावर आपली मजबूत पकड कायम ठेवली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.