बीजिंग : संयुक्त राष्ट्राने दिलेल्या स्पष्टीकरणानूसार कोरोना संसर्गाची सुरुवात ही चीनमधून झाली असून काही कालावधीनंतर याचा फैलाव हा वेगाने जगभर झाला आहे. कोरोना संसर्गामूळे जगभरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन यात जीवीत आणि वित्तीयहानी मोठ्या प्रमाणात झाली यामूळे जगातील संपुर्ण मानवजातीला अनिष्ट परिणाम भोगावे लागले आहेत. सुमारे दोन वर्षे भारतासारख्या विकसनशील राष्ट्राने ही याची किंमत चुकती केली आहे. (The increase in covid -19 cases in China)
यातुन जग काहीशे सावरते तोवर चीनच्या शांघायनंतर बीजिंगमध्ये कोरोनाचा कहर सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये (China) कोरोना नियंत्रणासाठी कडक निर्बंध असूनही चीनमध्ये सद्य स्थितीत रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. चीनच्या बीजिंगमधील सर्वात मोठा जिल्हा, चाओयांगने सर्व नागरिकांसाठी तीन टप्प्यांमध्ये कोविड-१९ चाचणीस सुरुवात केली आहे.
येथील लोकांना भीती आहे, की त्यांनाही शांघायप्रमाणे लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल. शांघायमध्ये लोक अनेक दिवसांपासून घरात कैद असून त्यांच्या खाण्याची आभाळ होत आहे. चाओयांग जिल्ह्यात जवळपास ३५ लाख लोक राहतात. हा केंद्रीय व्यापार जिल्हा असून येथे विदेशी दुतावास आणि गंगनचुंबी इमारती आहेत. येथे लाखो लोक काम करतात. शहरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रविवारी घोषणा केली.
या वातावरणामूळे चीनमधील नागरीक एकमेकांना सोशल मीडियावर आग्रह करित आहेत, की जर आठवड्याच्या मध्यात तत्काळ लॉकडाऊनची घोषणा केली गेली तर ते खाद्यान्न आणि अत्यावश्यक वस्तूंचा साठा करु शकतात. स्थानिक स्वयंसेवक शांतात आणि शिस्तपालन राखा असे आवाहन करित आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.