"आरोग्य व्यवस्था कोलमडत चाललीयं", श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी दिला इशारा

श्रीलंकेतील आरोग्य व्यवस्था कोलमडत चालली असल्याचे श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी म्हटले आहे.
 Sri Lanka
Sri LankaDainik Gomantak
Published on
Updated on

भीषण आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. देशावरील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर, श्रीलंकेचे (Sri Lanka) पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आज राष्ट्राला संबोधित करताना सांगितले की, ‘’लॉकडाऊनमुळे (Lockdown) देशाची अर्थव्यवस्था खलावत चालली आहे. त्यामुळे परकीय गंगाजळीचा तुटवडा जाणवत आहे.’’ आपल्या भाषणादरम्यान, महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) यांनी अशा पैलूंवर प्रकाश टाकला ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खराब झाली. यावेळी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी देशातील जनतेला सरकारविरोधी निदर्शने थांबवण्याची विनंती केली आहे. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी सरकार चोवीस तास काम करत आहे. (The health system is collapsing the Sri Lankan prime minister warned)

महिंदा राजपक्षे म्हणाले की, ‘’कोरोना महामारी आल्यापासून आपण या आर्थिक संकटाचा सामना करत आहोत. देशाची अर्थव्यवस्था ढासळत असतानाही, लोकांचे आरोग्य लक्षात घेऊन आम्हाला लॉकडाऊन लागू करणे भाग पडले, त्यामुळे परकीय गंगाजळी संपली.’’ गेल्या आठवड्यात, सरकारने देशातील जनआक्रोश रोखण्यासाठी पारंपारिक सिंहली आणि तामिळ नवीन वर्षांसह अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. विशेष म्हणजे, विक्रमी चलनवाढ आणि वारंवार होणार्‍या ब्लॅकआऊटसह अन्न आणि इंधनाचा तुटवड्यामुळे श्रीलंका अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलसाठी लोकांना कित्येक तास ताटकळत राहावे लागत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर वाईट परिणाम झाला असून, वीजपुरवठा खंडित झाल्याने लोक मेटाकुटीला आले आहेत.

 Sri Lanka
आशिया आणि आफ्रिकेनंतर श्रीलंका चीनच्या कर्जाच्या सापळ्यात!

दरम्यान, अन्न आणि इंधनाच्या तुटवड्यामुळे श्रीलंकेला गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. तर आधीच कोरोना महामारीमुळे श्रीलंकेतील व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत. परिणामी, श्रीलंकेलाही परकीय चलनाच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे ज्यामुळे, संयोगाने अन्न आणि इंधन आयात करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. याचाच परिणाम म्हणून देशात दीर्घकाळ वीज कपात करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com