9/11च्या दहशतवादी हल्ल्याचे 'गुप्तचर दस्तऐवज' होणार सार्वजनिक

सार्वजनिक करण्याचे आदेश अमेरिकेचे (America) अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) शुक्रवारी यांनी दिले आहेत.
Joe Biden
Joe BidenDainik Gomantak
Published on
Updated on

9/11च्या दहशतवादी (9/11 Terrorist attacks) हल्ल्याच्या सरकारी तपासाची गुप्त कागदपत्रे (Secret Documents) सार्वजनिक करण्याचे आदेश अमेरिकेचे (America) अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) शुक्रवारी यांनी दिले आहेत. येत्या सहा महिन्यांत ही गुप्त कागदपत्रे प्रसिद्ध केली जातील असं सांगण्यात आहे. 11 सप्टेंबर 2001 रोजी अल कायदा (Al-Qaeda) या दहशतवादी संघटनेकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यांमध्ये सुमारे 3,000 पेक्षा अधिक अमेरिकन नागिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यांमध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईंकांकडून या गुप्तचर अहवाल सार्वजिनक करण्याची मागणी केली जात होती. आता बायडन यांनी मागणीला प्रत्युत्तर म्हणून हा अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, या हल्ल्यानंतरच अमेरिकेने अफगाणिस्तानातमध्ये आपले सैन्य उतरवले होते. त्यानंतर तालिबानला सत्तेतून बेदखल करत लोकशाहीचा पुरस्कर करणारे मात्र आपल्या तालावर नाचणारे सरकार स्थापन केले होते.

Joe Biden
पंजशीरवर कब्जा केल्याचा तालिबान्यांचा दावा, देश सोडला नसल्याचे सालेहचे स्पष्टीकरण

दरम्यान, त्याच वेळी, हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की या गुप्तचर दस्तऐवजांमध्ये पुरावा असू शकतो की सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) सरकारचे वर्ल्ड ट्रेड सेंटरवर (World Trade Center) झालेल्या हल्यांमधील दहशतवाद्यांशी संबंध असू शकतो. जे विमान वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉनच्या (Pentagon) दिशेने हे दहशतवादी घेऊन गेले होते. अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन सौदी अरेबियाचा नागरिक होता. 2011 मध्ये पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये ओसामाला ठार करुन अमेरिकेने या हल्ल्याचा बदला घेतला. त्याच वेळी, अमेरिका आणि सौदी अरेबियाचे जवळचे सख्य होते.

कागदपत्रे प्रसिद्ध करण्याबाबत अमेरिकन अध्यक्ष काय म्हणाले?

बायडन यावेळी म्हणाले, "आज, मी 11 सप्टेंबर रोजी 'फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन' (एफबीआय) तपासाशी संबंधित कागदपत्रांच्या अवर्गीकरणाच्या पुनरावलोकनाचे निरीक्षण करण्यासाठी न्याय विभाग आणि इतर संबंधित एजन्सींना निर्देश देणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली." ते पुढे म्हणाले की, ही कागदपत्रे येत्या सहा महिन्यांत सार्वजनिक करण्यात येतील. यावे. इतिहासातील अमेरिकेन इतिहासामधील सर्वात भयंकर दहशतवादी हल्ला होता. यामध्ये 2,977 निष्पाप अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला.

Joe Biden
Afghanistan War: तालिबान्यांचा कंधारवर कब्जा

सौदी अरेबिया या हल्ल्यात सहभागी होता का?

9//११ च्या दहशतवादी हल्ल्यांबाबत गुप्त कागदजपत्रे सार्वजनिक करण्यासंबंधी दबाव वाढत आहे. माहिती प्रसिद्ध करण्यासंबंधी पीडितांचे कुटुंबे सौदी अरेबियावर त्यांच्या हल्ल्यातील कथित सहभागासाठी खटला भरण्याची तयारी करत आहेत. कागदपत्रे न दिल्याने या पीडितांचे कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. अधिकृत 9/11 आयोगाने म्हटले आहे की, सौदी सरकार एक संस्था किंवा सौदीचे वरिष्ठ अधिकारी वैयक्तिकरित्या अल-कायदाला आर्थिक मदत करत असल्याचा कोणताही पुरावा नाही. मात्र, या वक्तव्यानंतर सौदी अरेबियाच्या दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्यात भूमिका बजावली असावी अशीही चर्चा होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com