Lucky Draw Winner: जिंकलं पठ्ठ्यानं ! गाड्यांची साफसफाई करणारा भरत बनला दुबईत 'कोट्यधीश'

Lucky Draw Winner: कोणाचं नशिबी कधी चमकेल हे काही सांगता येत नाही.
Bharat
BharatDainik Gomantak
Published on
Updated on

Lucky Draw Winner: कोणाचं नशिबी कधी चमकेल हे काही सांगता येत नाही. नुकतेच दुबईतून असेच प्रकरण समोर आले आहे. रिपोर्टनुसार, नेपाळचा रहिवासी असलेल्या 31 वर्षीय भरतचे नशीब असे बदलले की, तो दुबईत करोडपती बनला. यापूर्वी भरत गाड्या साफ करण्याचे काम करायचा. भरतने 'मेहजूज ड्रॉ' मध्ये 21 कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकला आहे.

भरतचे कुटुंब आर्थिक हालाखीचा सामना करत होते

मीडियानुसार, भरत ही रक्कम त्याच्या कुटुंबावर आणि ब्रेड ट्यूमरमुळे अर्धांगवायू झालेल्या त्याच्या भावाच्या शस्त्रक्रियेसाठी खर्च करणार आहे. भरतचे जीवन संघर्षांनी भरलेले आहे. त्याने सांगितले की, मी गेल्या तीन वर्षांपासून कार धुण्याचे काम करत आहे. माझ्या भावावर दिल्लीतील (Delhi) रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर वडील भारतात रिक्षा चालवतात.

Bharat
Canada: कॅनडात राहणाऱ्या भारतीयांसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून अ‍ॅडव्हायझरी जारी

नशीबाने साथ दिली

भरत हा दोन मुलांचा बाप आहे. एके दिवशी त्याने त्याच्या दोन मित्रांसमवेत एक लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. लॉटरीमध्ये एवढी मोठी रक्कम जिंकणारा भरत हा देशातील पहिलाच विजेता ठरला आहे. तो पुढे म्हणाला की, मी 27 सप्टेंबरला मायदेशी म्हणजेच नेपाळला (Nepal) परतणार आहे. आणि काही दिवसांनंतर पुन्हा 'मेहजूज ड्रॉ' मध्ये नशीब आजमावणार आहे.

Bharat
Canada: कॅनडात पंजाबींचे 'बल्ले-बल्ले'! दक्षिण आशियाई भाषा बोलणाऱ्यांचा वरचष्मा

केरळमधील एका व्यक्तीने 23 कोटी जिंकले

काही दिवसांपूर्वी केरळमधील (Kerala) तिरुअनंतपुरम शहरातील एका ऑटो रिक्षा चालकाने ओणम बंपर लॉटरीचे पहिले बक्षीस जिंकले होते, ज्याची एकूण रक्कम 25 कोटी रुपये होती. कर कपात करुन त्याला 15.75 कोटी रुपये मिळाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com