अमर व्हायचंय म्हणून ‘या’ कोट्याधीशाने केली मोठी गुंतवणूक!

अलीकडेच बेजोस यांनी अंतरिक्षाचाही दौरा केला होता. सध्या जेफ 200 बिलियन डॉलर संपत्तीचे मालक आहेत.
Jeff Bezos
Jeff BezosDainik Gomantak
Published on
Updated on

वृध्दपकाळ पाहू इच्छिणारी माणसं जगभरात खूप कमी आहेत, ज्यांना स्वमरणाची इच्छा असते. विज्ञानाच्या जगामध्ये जगण्याच्या प्रक्रियेवर संशोधन सुरु आहे. Unity Biotechnology नावाची कंपनी यावर संशोधन करत आहे. ही कंपनी मानवाच्या शरिरावर मागील अनेक वर्षापासून संशोधन करत आहे. अशावेळी अमेझॉनचे मालक जेफ बेजोस (Jeff Bezos) यांनी विज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी या कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ही कंपनी संशोधन करेल आणि त्यानंतर अमरत्व मिळेल अशी, आशा बेजोस यांनी व्यक्त केली आहे.

Jeff Bezos
"अ‍ॅमझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांना मागं टाकत, यांनी मिळवला जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान"

दरम्यान, अलीकडेच बेजोस यांनी अंतरिक्षाचाही दौरा केला होता. सध्या जेफ 200 बिलियन डॉलर संपत्तीचे मालक आहेत. त्यांनी Unity Biotechnology नावाच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करत त्यांनी येणाऱ्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचे कार्य करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्याशिवाय मानवी शरीरामध्ये वाढत्या वयामुळे होणाऱ्या गंभीर आजारांना रोखण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले आहे. त्याशिवाय मानवी शरीरीमधील सेलवरही कंपनी सध्या काम करत आहे. काही दिवसांपूर्वीच या कंपनीने पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले.

Jeff Bezos
अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस करणार अंतराळवारी

कंपनीत Reverse Ageing या टेक्नॉलॉजीवर काम सुरु आहे. पत्रकार परिषदेनंतर Altos Lab ची स्थापना करण्यात आली. या कंपनीमध्ये अनेक मोठ मोठ्या उद्योगपतींनी आपली गुंतवणूक केली आहे. ज्यामध्ये रशियाचे करोडपती Yuri Milner त्यांनी पत्नी Julia यांच्याही नावाचा समावेश आहे. तसेच कंपनीमधील संशोधनसाठी पैशांची गुंतवणूक येणाऱ्या काळांमध्ये वाढविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com