अमेरिकेवर झालेला हल्ला लादेनने केला नव्हता: तालिबानी प्रवक्त्याचा अजब दावा

अमेरिकेने (America) अफगाणिस्तानवर युद्ध लादण्यासाठी निमित्त म्हणून त्याचा वापर केला.
Osama bin Laden
Osama bin LadenDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने (Taliban) आता उघडपणे अल कायदा या दहशतवादी संघटनेची बाजू घेण्यास सुरुवात केली आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीबुल्ला मुजाहिद (Zabibullah mujahid) याने दावा केला की, 11 सप्टेंबर रोजी अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ओसामा बिन लादेनचा (Osama bin Laden) सहभाग नव्हता. अमेरिकेने (America) अफगाणिस्तानवर युद्ध लादण्यासाठी निमित्त म्हणून त्याचा वापर केला.

तालिबानचे प्रवक्ते जबीबुल्ला मुजाहिद याने मुलाखती दरम्यान म्हटले की, "युद्धानंतर 20 वर्षे उलटली तरी 11 सप्टेंबरच्या हल्ल्यात ओसामा बिन लादेनच्या सहभागाचा कोणताही पुरावा नाही. मुजाहिद पुढे म्हणाला, "या युद्धाचे कोणतेही औचित्य नव्हते, त्याचा वापर अमेरिकनांनी युद्धाचे निमित्त म्हणून केला."

Osama bin Laden
दहशतवादी बनला तालिबान सरकारमध्ये संरक्षण मंत्री

तालिबान याची हमी देऊ शकतो का, असा प्रश्न विचारता अफगाणिस्तान पुन्हा कधीही अल-कायदा सारख्या दहशतवादी संघटनांना अशा प्रकारचा घातपात घडवून आणण्यासाठी मदत करणार नाही असं यावेळी त्याने म्हटले. ज्याने 9//11 चा हल्ला घडवून आणला त्यांना अफगाणिस्तानमध्ये कोणत्याही प्रकारचा आश्रय यापुढे देण्यात येणार नाही, अशी आश्वासने यापूर्वीही तालिबानकडून देण्यात आली आहेत.

जबीबुल्ला मुजाहिद पुढे म्हणाला, “जेव्हा लादेन अमेरिकी सरकारसाठी समस्या बनला, तेव्हा तो अफगाणिस्तानात होता. परंतु त्या हल्ल्यात त्याच्या सहभागाचा कोणताही पुरावा नव्हता. आम्ही आता आश्वासन दिले आहे की, अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर यापुढे कोणत्याही देशाविरुद्ध दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी करु देणार नाही.

Osama bin Laden
अफगाणिस्तानात 'पाकिस्तान तालिबान' चे 6000 दहशतवादी अ‍ॅक्टिव

वास्तविक अमेरिका आजपर्यंत 9//11 च्या दहशतवादी हल्ल्याची वेदना विसरलेला नाही. 2001 मध्ये अल कायदा या दहशतवादी संघटनेने अमेरिकेवर सर्वात मोठा हल्ला केला होता. बिन लादेन या हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा दावा अनेक अहवालातून करण्यात आला होता. त्याचबरोबर अहवालात हल्ल्यामागील कारण देत असा दावा करण्यात आला होता की, त्याचे कुटुंब त्याच्यापासून विभक्त झाल्यामुळे तो दु: खी झाला होता, आणि यासाठी त्याने अमेरिकेला दोष दिला होता.आणि कारणास्तव त्याने अमेरिकेवर एवढा मोठा हल्ला केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com