

टेक्सास: टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग एबॉट(Governor of Texas Greg Abbott) यांनी पुढच्या महिन्यापासून सर्व सार्वजनिक शाळांमध्ये(Schools) मास्क(Mask) लावणे गरजेचे नाही असा आदेश जाहीर केला आहे. मात्र यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशनने (CDC) जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांच्या अगदी उलट त्यांचा हा आदेश आहे. ज्यात अमेरिकेमध्ये मास्क काढून टाकण्याची मागणी केली होती.(Texas governor lifts ban on wearing masks in schools)
टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग एबॉट यांनी आपल्या कार्यकारी आदेशानुसार राज्यातील सरकारी संस्थांसाठी काम करणार्या आणि त्यांना भेट देणाऱ्यांसाठी मास्क घालण्याची अट कायम ठेवली आहे. सीडीसीच्या नव्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करत फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसॅन्टिस यांनीही असा आदेश दिला आहे. एबॉट यांनी असे म्हटले आहे की, लसीकरणाद्वारे टेक्सास कोरोना साथीच्या आजारापासून बरा होण्याच्या मार्गावर आहे. त्याचबरोबर बरे होणाऱ्या रूग्णसंख्येत वाढ होत आहे. लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार होत आहेत. सरकारच्या विचारानुसार, टेक्सासच्या लोकांना आता जास्त दिवस मास्क घालावा लागणार नाही. मात्र मास्क लावायचा की नाही हे सरकारने लोकांच्या विवेकबुद्धीवर सोडले आहे.
एबॉटसह रिपब्लिकन नेत्यांनी या निर्णयाला समर्थन दिले आहे, लोकांनी मास्क लावायचा की नाही हे खाजगीरित्या आणि आपआपल्या जबाबदारीवर ठरवावे लागेल. साथीच्या काळात मास्क ची सर्वात जास्त गरज होती कारण त्या वेळी रुग्णालयांमध्ये रूग्णांची संख्या बरीच जास्त होती. यामुळे मृत्यूचेही प्रमाण जास्त होती. जेव्हा या तीन महिन्यांत राज्यात कोरोना संसर्गाची प्रकरणे कमी होऊ लागली, तेव्हा जनतेकडून मास्क वरून बंदी हटवण्याचे आवाज आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.