Terror Attack: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पुन्हा हैदोस! मुलींच्या शाळेला बॉम्बने दिले उडवून

Terror Attack In Khyber Pakhtunkhwa: पाकिस्तानच्या वायव्य खैबर पख्तूनख्वा प्रांतात दहशतवाद्यांनी मुलींच्या सरकारी प्राथमिक शाळेला बॉम्बने उडवून दिले.
Terror Attack
Terror AttackDainik Gomantak
Published on
Updated on

Terror Attack In Khyber Pakhtunkhwa: पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात दहषशतवाद्यांनी पुन्हा हैदोस घालण्यास सुरुवात केली आहे. दहशतवाद्यांनी मुलींच्या सरकारी प्राथमिक शाळेला बॉम्बने उडवून दिले. या स्फोटासाठी आयईडीचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. स्फोटावेळी शाळेत कोणीही नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.

फॉरेन्सिक टीम तैनात

पोलिसांच्या मते, बन्नू जिल्ह्यातील बाका खेल पोलिस परिसरातील अझान जावेद प्राथमिक शाळेच्या आवारात दहशतवाद्यांनी (Terrorists) स्फोटके ठेवली होती. या शक्तिशाली स्फोटामुळे इमारतीचे मोठे नुकसान झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एफआयआर नोंदवण्यात आला असून घटनास्थळावरुन पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीम तैनात करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी या हल्ल्याचा निषेध केला. दहशतवाद्यांचा हा हल्ला परिसरातील शैक्षणिक विकासाला अडथळा आणण्याचा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले.

एक हजाराहून अधिक शाळा उद्ध्वस्त करण्यात आल्या

ऑस्ट्रेलियन 'थिंक टँक' लोवी इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, 2007 ते 2017 दरम्यान या भागात 1100 हून अधिक मुलींच्या शाळा उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. यादरम्यान, महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींनाही लक्ष्य करण्यात आले. 2014 मध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांनी सुरु केलेल्या मोठ्या लष्करी कारवाईपूर्वी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ने स्वात जिल्ह्यातील त्यांच्या बालेकिल्ल्यातून आदिवासी भागात आणि वायव्य प्रांतातील इतर जिल्ह्यांमधील मुलींच्या शाळांवर शेकडो हल्ले केले होते. या कारवाईनंतर टीटीपीचे दहशतवादी अफगाणिस्तानात पळून गेले.

यापूर्वीही स्फोट झाले

दरम्यान, अलिकडेच खैबर पख्तूनख्वा प्रांतात झालेल्या बॉम्बस्फोटात सहाय्यक आयुक्तांसह पाच सरकारी अधिकारी ठार झाले होते. तर 11 जण जखमी झाले होते. हा स्फोट अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या बाजौरमधील खार तहसीलच्या मेळ्याच्या मैदानाजवळ झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com