स्वातंत्र्यदिनीच इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला; तिघांनी गमावला जीव

दहशतवाद्यांना हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल: पीएम बेनेट
Terrorist attack Israel on Independence day
Terrorist attack Israel on Independence dayDainik Gomantak
Published on
Updated on

इस्रायलच्या इलाद येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तिघे ठार झाले, तर 4 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायल गुरुवारी स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना हा हल्ला झाला. इस्रायलमध्ये गेल्या काही आठवड्यांत दहशतवादी हल्ले वाढले आहेत. (Terrorist attack Israel on Independence day)

Terrorist attack Israel on Independence day
आजपासून भारत-रशिया उड्डाणे पुन्हा सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दहशतवाद्यांनी सेंट्रल पार्कमध्ये अनेक लोकांवर चाकूने हल्ला केला. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर हा हल्ला झाला.

दहशतवाद्यांना हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल: पीएम बेनेट
दुसरीकडे, पोलिसांनी (Police) हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. नाकाबंदी करण्यात आली आहे. याशिवाय हेलिकॉप्टरही शोध मोहिमेत गुंतले आहेत. दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी गुरुवारी सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यानंतर ते म्हणाले, "आम्ही दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांना पकडू आणि त्यांना या हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल."

Terrorist attack Israel on Independence day
करीन जीन-पियरे व्हाईट हाऊसच्या नवीन प्रेस सेक्रेटरी

हा हल्ला दोन जणांनी केल्याचे इस्रायल पोलिसांनी सांगितले. दहशतवाद्यांचा शोध अजूनही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय सर्व संशयास्पद वाहनांचा शोध घेण्यात येत आहे. दुसरीकडे, हमास या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याचे कौतुक केले असून या हल्ल्याचा संबंध जेरुसलेममधील हिंसाचाराशी जोडला आहे. अल-अक्सा मशिदीवरील हल्लेखोरांना सोडले जाऊ शकत नाही, असे हमासने म्हटले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com