वर्षानुवर्ष बंद असलेल्या इमारतीत दोन भाऊ गेले फिरायला, कॅमेऱ्यात कैद झाला भलताच प्रकार

ही इमारत बरीच जुनी आणि जीर्ण दिसतेय
Terrifying moment ‘ghost’ is caught on camera at abandoned care home
Terrifying moment ‘ghost’ is caught on camera at abandoned care homeDainik Gomantak

जगभरातील सर्वच लोक भूतांवर किंचितही विश्वास ठेवत नाहीत, परंतु अनेकवेळा अशा घटना आपल्या डोळ्यांसमोर घडतात किंवा असा काही प्रकार दिसला की जगात भुताचे अस्तित्व असल्याचे दिसते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळाला. ज्यामध्ये भूत दिसू शकते, हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. कारण हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ ब्रिटीश वृत्तपत्र द सनने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. (Terrifying moment ‘ghost’ is caught on camera at abandoned care home)

हा व्हिडिओ शेअर करत वृत्तपत्राने लिहिले की, केअर होममध्ये भूताचा भयानक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आज सकाळी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जो की आतापर्यंत एक लाख तीन हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

Terrifying moment ‘ghost’ is caught on camera at abandoned care home
'पीएम आवास योजने' अंतर्गत भारत सरकार देतय 20 लाख रुपये? व्हायरल मेसेजचे सत्य नेमके काय

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती इमारतीच्या पायऱ्या चढताना दिसत आहे. ही इमारत बरीच जुनी आणि जीर्ण झालेली दिसते. पायऱ्यांच्या वर एक खिडकी दिसते. ही खिडकी उघडी आहे. त्या तरुणाच्या पाठीमागे इतर तरुणांसह एक कॅमेरा धावत आहे. तो कॅमेरा खिडकीकडे दाखवताच एक काळा प्रकाश येतो आणि दोन तेजस्वी डोळे देखील दिसतात. यासोबतच काही विचित्र आवाजही ऐकायला मिळतोय. त्यानंतर दोघेही शांत होतात.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दोघांची नजर खिडकीवर पडताच तिथे उपस्थित असलेला काळा प्रकाश अचानक खोलीच्या दिशेने जातो. त्यानंतर दोघेही भयभीत होतात. त्यानंतर ती व्यक्ती अनेक वेळा आवाज देते पण त्याला समोरून उत्तर मिळत नाही. यासोबतच त्या व्यक्तीला पायऱ्यांखाली दुसऱ्या खोलीच्या दारातही असाच काहीसा प्रकार दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com