सत्तासंघर्षानंतर पत्रकार परिषद घेत तालिबान्यांच्या जगाला संदेश

अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात आल्यानंतर पहिल्यांदाच तालिबानने (Taliban) काल माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे (Press Conference by Taliban).
Taliban's Press Conference in Kabul
Taliban's Press Conference in Kabul Dainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात आल्यानंतर पहिल्यांदाच तालिबानने (Taliban) काल माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे (Press Conference by Taliban). मंगळवारी तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद (Zabihullah Mujahid) यांनी काबूलमध्ये (Kabul) पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाच्याविषयवार भाष्य केले आहे.या पत्रकार परिषदेमध्ये स्त्रियांबद्दल त्याचा दृष्टिकोन काय असेल, आंतरराष्ट्रीय संस्थांशी तालिबानला कोणत्या प्रकारचे संबंध ठेवायचे आहेत, माध्यमांसाठी त्याचे नियम काय असतील? या सर्व प्रश्नांची उत्तरे तालिबानकडून देण्यात अली आहेत. (Taliban's Press Conference in Kabul)

तालिबानच्या पत्रकार परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे ते आंतरराष्ट्रीय समुदायाकडून तालिबानला मान्यता देण्याची मागणी करत आहे. त्याचबरोबर, अफगाणिस्तानमधील दूतावासांना कुठलीही हानी पोहोचवणार नाही असे आश्वासनही तालिबानकडून देण्यात आले आहे.ते काही नियमानंसह महिला आणि प्रेसला सुद्धा सूट देण्याचे वचन त्यांनी दिले आहे.

  • अफगाणिस्तानची जमीन कोणत्याही देशाविरुद्ध कट, हल्ले करण्यासाठी वापरू दिली जाणार नाही.

  • कोणत्याही आंतरराष्ट्रीय दूतावास किंवा संस्थेला हानी पोहोचवणार नाही. त्यांना तालिबानकडूनच सुरक्षा दिली जाईल. जबीहुल्ला मुजाहिद म्हणाले, 'काबूलमधील दूतावासांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आम्ही सर्व देशांना आश्वासन देऊ इच्छितो की आमचे सैन्य सर्व दूतावास, आंतरराष्ट्रीय संस्था आणि मदत संस्थांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तेथे आहेत.

  • शरिया कायद्याअंतर्गत महिलांना अधिकार आणि स्वातंत्र्य देईल. ते आरोग्य क्षेत्र आणि शाळांमध्ये काम करू शकतील. महिलांना माध्यमांमध्येही काम करता येईल का? या प्रश्नाला प्रवक्त्याने मुरडलेले उत्तर दिले. ते म्हणाले की, तालिबान सरकार स्थापन झाल्यावर शरिया कायद्यानुसार कोणत्या सूट मिळतील हे स्पष्टपणे सांगितले जाईल.

  • खाजगी माध्यमांना स्वतंत्रपणे काम करण्याची परवानगी देवू पण पत्रकार अफगाणिस्तानची मूल्ये लक्षात घेऊन काम करतील

Taliban's Press Conference in Kabul
अफगाण महिलांचा सरकारमध्ये समावेश असणार; तालिबानने केले स्पष्ट
  • प्रवक्त्याने सांगितले की, अफगाण युद्ध आता संपले आहे. भूतकाळात तालिबानच्या विरोधात कोणीही युद्ध केले असेल त्याला तालिबान आता माफ करत आहे . प्रवक्त्याने पुढे म्हटले- कोणत्याही देश-व्यक्तीवर सूड घेण्याचा कोणताही हेतू नाही. यात माजी सैनिक, माजी अफगाणिस्तान सरकारचे सदस्य यांचाही समावेश आहे.

  • अफगाणिस्तानात कोणीही कुणाचे अपहरण करू शकणार नाही. कोणीही कोणाचा जीव घेऊ शकत नाही. सतत सुरक्षा वाढवण्यावर भर देवू

  • तालिबानने आश्वासन दिले की त्यांच्या सरकारमध्ये देशाची अर्थव्यवस्था आणि लोकांचे जीवनमान सुधारेल.

  • तालिबान प्रवक्ते म्हणाले, 'तालिबानची प्राथमिकता कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करणे आहे. यानंतर लोक शांततेत राहू शकतील'.

  • तालिबानने अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या लोकांना आश्वासन दिले, 'तुमचे कोणी नुकसान करणार नाही. तुमचा दरवाजा कोणीही ठोठावणार नाही.

  • मागील सरकार (अशरफ घनी यांचे सरकार) सक्षम नव्हते आणि ते कोणालाही सुरक्षित ठेवू शकत नाही असा दावा प्रवक्त्याने केला. प्रवक्त्याने आश्वासन दिले की तालिबान सर्वांना सुरक्षा प्रदान करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com