Iraq: कोविड रुग्णालयाला भीषण आग, अनेक रुग्णांचा मृत्यू

दक्षिणी बगदादमधील अल हुसेन शिक्षण रुग्णालयात ही घटना घडली असून या आगीनंतर मोठा भडका उडाल्याने बहुतांश लोकांचा मृत्यू झाला असून जखमींची प्रकृती चिंताजनक
Iraq's covid hospital fire,  kills several patients
Iraq's covid hospital fire, kills several patientsTwitter

इराकची(Iraq) राजधानी बगदाद(Baghdad) मध्ये एका कोविड रुग्णालयाला(Covid Hospital) आग(Fire) लागल्याची घटना घडली आहे.ताज्या माहितीनुसार या भीषण आगीत 50 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची महती मिळत आहे. तसेच 12 लोक या आगीत गंभीर जखमी आहेत. रुग्णालयाच्या कोरोना वार्डमध्ये ही मोठी आग लागली. या वार्डमध्ये कोरोना रुग्ण उपचार घेत होते. तेथेच ही आग लागली आहे.

दक्षिणी बगदादमधील अल हुसेन शिक्षण रुग्णालयात ही घटना घडली असून या आगीनंतर मोठा भडका उडाल्याने बहुतांश लोकांचा मृत्यू झाला असून जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे बोलले जात असले तरी या संपूर्ण अपघाताची चौकशी करण्यात आलेली नाही.

शॉर्ट सर्किटने आग लागली असल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जात असले तरी आतापर्यंत शासनाकडून कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही. फक्त तीन महिन्यांपूर्वी रुग्णालयात नवीन कोरोना वॉर्ड सुरू करण्यात आला होता, त्यामध्ये कोरोना रुग्णांचे एकूण 70 बेड होते.

आरोग्य विभागाचे प्रवक्ते आमिर जमीली म्हणाले की, आगीच्या या घटनेवेळी त्या जागी एकूण 63 रुग्ण उपचार घेत होते. तसेच इराकचे नागरी संरक्षण प्रमुख मेजर जनरल खालिद बोहन म्हणाले, हॉस्पिटलच्या बांधणीत ज्वलनशील साहित्य वापरण्यात आले, त्यामुळे आग अधिक भडकली आणि ती मोठया पसरली आहे.

Iraq's covid hospital fire,  kills several patients
'ड्रॅगनला' अमेरिकेने खडसावले !

इराकमधील इस्पितळात आगीमुळे इतक्या मोठ्या संख्येने कोरोना रूग्णांचा मृत्यू झाल्याची या वर्षातील ही दुसरी घटना आहे.कारण याच वर्षी एप्रिलमध्ये अशाच एका घटनेत 83 लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. ऑक्सिजन टाकीमध्ये स्फोट झाल्यानंतर इब्न अल खतीब रुग्णालयात हि घटना घडली होती.

आता या घटनेने पुन्हा एकदा इराकच्या रूग्णालयांमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाला असून हा गंभीर गैरप्रकार उघडकीस आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com