Taliban Effect: भारतात 'ड्राय फ्रुट्स' चे दर वाढणार

अफगाणमधून भारतात फक्त सुका मेवा (Dry Fruits) आयात केला जातो
Dry Fruits
Dry FruitsDainik Gomantak
Published on
Updated on

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यानंतर भारतीय अर्तव्यवस्थेवर (Indian Economy) काय परिणाम होणार असा प्रश्न आधीच उपस्थित झाला होता. आणि आता तालीबान्यांनी पुर्ण अफगाणचा ताबा घेतल्याने भारताशी व्यापार (Business) बंद केला आहे. आता ना काबूलला (Kabul) निर्यात करता येणार ना तिथून काही आयात करता येणार. यामुळे बाजारात सुका मेवा (Dry Fruits) महाग होण्याची शक्यता अर्थ तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

Fig
FigDainik Gomantak

फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन (FIEO) चे महासंचालक डॉ अजय सहाय म्हणाले, "आम्ही अफगाणिस्तानमधील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहोत. भारतातील आयात पाकिस्तानच्या ट्रांजिट मार्गाने होते. सध्या तालिबानने पाकिस्तानला जाणारा सर्व माल बंद केला आहे. त्यामुळे आभासी आयातही थांबली आहे.

Plum
PlumDainik Gomantak

काही उत्पादने इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरद्वारे पाठवली जातात, जी अजूनही कार्यरत आहेत, असे सहाय यांनी सांगितले. दुबईमार्गे पाठवल्या जाणाऱ्या उत्पादनांचा रस्ता सध्या बंद केला नाही. अफगाणिस्तानमध्ये वेगाने बदलणारी परिस्थिती असूनही भारताचे व्यापारी संबंध कायम राहतील अशी आशा एफआयईओ डीजीने व्यक्त केली आहे.

Dry Fruits
तालिबान्यांचा अफगाणिस्तानवर कब्जा, भारताच्या व्यापारावर होणार मोठा परिणाम
Walnut
WalnutDainik Gomantak

या गोष्टींचा द्विपक्षीय व्यापार

भारत सध्या अफगाणिस्तानला साखर, औषधे, कपडे, चहा, कॉफी, मसाले आणि ट्रान्समिशन टॉवर पुरवतो, तर तेथून येणारी बहुतेक आयात फक्त ड्रायफ्रूट्स आहे. आम्ही तिथून काही कांदे आणि डिंकही आयात करतो, असे FIEO डीजीने सांगितले.

Cashew
CashewDainik Gomantak

भारत-अफगाणिस्तान व्यापार

  • अफगाणिस्तानच्या व्यापारी भागीदारांमध्ये भारत पहिल्या 03 देशांमध्ये आहे

  • 2021 मध्ये दोघांमध्ये 835 दशलक्ष डॉलर्सचा द्विपक्षीय व्यापार झाला

  • भारताने अफगाणिस्तानातून 51 दशलक्ष किंमतीच्या वस्तू आयात केल्या

  • भारताने अफगाणिस्तानच्या भूमीवर 03 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे

  • 400 प्रकल्पांमध्ये पैसे गुंतवले गेले आहेत, त्यापैकी काही सध्या कार्यरत स्थितीत आहेत.

Almonds
AlmondsDainik Gomantak

अफगाणी लोक भारतात सुक्या मनुका, अक्रोड, बदाम, अंजीर, पाइन नट्स, पिस्ता, सुक्या जर्दाळू आणि जर्दाळू, चेरी, टरबूज आणि औषधी वनस्पती आणतात. भारताची त्या देशाकडे जाणाऱ्या शिपमेंटमध्ये चहा, कॉफी, मिरपूड आणि कापूस यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com