Taliban: तालिबानचा नवा फर्मान जारी, महिलांना जिममध्ये जाण्यास घातली बंदी

Taliban leader: अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून तालिबानने अनेक आदेश जारी केले आहेत.
Taliban leader
Taliban leaderDainik Gomantak
Published on
Updated on

Taliban leader: अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून तालिबानने अनेक फर्मान जारी केले आहेत. गुरुवारी तालिबानने अफगाणिस्तानमध्ये महिलांना जिममध्ये जाण्यास बंदी घातली. तालिबानने वर्षभरापूर्वी सत्ता हाती घेतल्यापासून महिलांचे हक्क आणि स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा नवा हुकूम आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्ट 2021 मध्ये तालिबान (Taliban) सत्तेवर आले. त्यानंतर त्यांनी देशातील मुलींना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत जाण्यास बंदी घातली. त्याचबरोबर, महिलांना नोकरीच्या बहुतेक क्षेत्रांमध्येही प्रतिबंधित केले आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांना (Women) डोक्यापासून पायापर्यंत बुरख्याने झाकण्याचे आदेशही दिले आहेत.

Taliban leader
Taliban Women Protest: स्वातंत्र्या'साठी निदर्शने करणाऱ्या महिलांवर तालिबानी सैनिकांचा गोळीबार

तसेच, धार्मिक व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, लोक आदेशांकडे दुर्लक्ष करत असल्याने आणि महिलांनी हिजाब घालण्याबाबतचे नियम पाळले नसल्याने ही बंदी घालण्यात आली आहे. महिलांना उद्यानात जाण्यासही बंदी आहे. महिलांना जिम आणि पार्कमध्ये जाण्यावर बंदी या आठवड्यापासून लागू झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com