तालिबानने 'अंतरिम' सरकारची केली घोषणा, मोहम्मद हसन अखुंद करणार नेतृत्व

मुल्ला मोहम्मद हसन अखुंद (Mohammed Hassan Akhund) हे या सरकारचे प्रमुख असतील. त्याचबरोबर अब्दुल गनी बरदार (Abdul Gani Bardar) यांना उपनियुक्त करण्यात आले आहे.
Taliban
TalibanDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतल्यानंतर सुमारे तीन आठवड्यांनी तालिबानने (Taliban) मंगळवारी 'अंतरिम' सरकारची (Interim Government) घोषणा केली. मुल्ला मोहम्मद हसन अखुंद (Mohammed Hassan Akhund) हे या सरकारचे प्रमुख असतील. त्याचबरोबर अब्दुल गनी बरदार यांना उपनियुक्त करण्यात आले आहे. मुल्ला हसन सध्या तालिबानची शक्तिशाली निर्णय घेणारी संस्था, रहबारी शूरा किंवा लीडरशिप कौन्सिलचे प्रमुख आहेत, जे गटाच्या सर्व बाबींवर सरकारी मंत्रिमंडळ म्हणून काम करते, शीर्ष नेत्याच्या मंजुरीने याचा कारभार चालतो. सरकारमधील अनेक महत्त्वाची पदे तालिबानच्या प्रमुख नेत्यांना देण्यात आली आहेत. मुख्य प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

Taliban
PAK मुळे तालिबान मध्ये फूट! मुल्ला बरादर आणि हक्कानी आमने-सामने

तालिबानचे संस्थापक मुल्ला उमर यांचा मुलगा मुल्ला याकूबला संरक्षण मंत्री, तर हक्कानी नेटवर्कचे नेते सिराजुद्दीन हक्कानी यांना गृहमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. काबूलमधील शासकीय माहिती आणि माध्यम केंद्रात पत्रकार परिषद देताना मुजाहिद म्हणाले की, हे मंत्रिमंडळ पूर्ण नाही, ते अजूनही कार्यकारी आहे. आम्ही देशाच्या इतर भागांतील लोकांनाही घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Taliban
Afghanistan Government: मुल्ला हसन अखुंद होणार तालिबान सरकारचा प्रमुख

तालिबानने सुमारे तीन आठवड्यांपूर्वी अफगाणिस्तानवर कब्जा केला होता, त्यानंतर अमेरिकन सैन्याने 31 ऑगस्टपर्यंत देश सोडला होता. त्यानंतर असे अनुमान लावले जात होते की, तालिबान लवकरच सरकार स्थापनेची घोषणा करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com