Switzerland: स्वतःचे घर, जमीन असावी हे प्रत्येकाचे स्वप्न असते. अनेकजण त्यांचे हे स्वप्न पूर्ण करतात, तर अनेकांसाठी हे स्वप्न स्वप्नच राहते. अनेकांना आलिशान घराबद्दल जे वाटते ते परवडत नाही आणि त्यांना छोट्या घरात समाधान मानावे लागते.
दरम्यान, तुम्हाला एखाद्या सुंदर ठिकाणी राहण्यासाठी आमंत्रित केले आणि त्याऐवजी तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला पैसे दिले तर तुम्हाला कसे वाटेल.
दुसरीकडे, अशी ऑफर कोणाला नको आहे? तुम्ही विचार करत असाल की हे कुठे होते भाऊ? पण असे एक गाव आहे, जिथे सरकार (Government) लोकांना गावात स्थायिक होण्यासाठी अशी ऑफर देत आहे.
सध्या या गावात स्थायिक होण्याची ऑफर चर्चेत आहे. या युरोपीय देशातील गावात स्थायिक होण्यासाठी सरकार लोकांना 50 लाख रुपये देऊ करत आहे. जास्त विचार करु नका, तिथले सरकार जनतेवर इतके मेहेरबान का आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मिररच्या रिपोर्टनुसार, अल्बिनेन हे स्वित्झर्लंडच्या (Switzerland) पर्वतांमध्ये वसलेले गाव आहे. या गावात स्थायिक होण्यासाठी सरकार £50,000 म्हणजेच 50 लाख रुपये देऊ करत आहे.
हे गाव 4265 फूट उंचीवर आहे. हे गाव स्विस प्रांतातील Valais मध्ये वसलेले आहे आणि फ्रान्स-इटली सीमेवर आहे. बर्फाने अच्छादलेले हे गाव खूपच सुंदर आहे, ते आपल्याला नार्निया चित्रपटाची आठवण करुन देते.
मात्र, येथील लोक आता या गावातून स्थलांतरित झाले आहेत. आता या गावात थोडेच लोक उरले आहेत. 2018 पासून, स्विस सरकार लोकांना येथे स्थायिक होण्यासाठी पैसे देऊ करत आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, £22,440 म्हणजेच 22 लाख रुपये 4 जणांच्या कुटुंबातील 18 वर्षांपेक्षा जास्त असलेल्यांना आणि £8,975 म्हणजेच प्रत्येक मुलाला 8 लाख रुपये दिले जातील.
तुम्ही तिथे जाऊन स्थायिक होण्याचा विचार करत असाल. पण भाऊ, यातही एक अट आहे, जी तुम्हाला पूर्ण करावी लागेल. तरच हे पैसे हातात येतील. या ऑफरची अट अशी आहे की, फक्त 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनाच याचा लाभ मिळेल.
दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्विस नागरिक आहात आणि तुमच्याकडे परमिट सी आहे. या ठिकाणी 10 वर्षे राहिल्यास घराची किंमत वाढेल, अन्यथा ही रक्कम तुम्हाला परत करावी लागेल, अशीही अट आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.