Sudan Gold Mine Accident: 7 दिवसांत दुसऱ्यांदा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सुदानमध्ये सोन्याची खाण खचून 11 मजुरांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

Sudan Gold Mine Accident 11 Dead: आफ्रिकन देश सुदानमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून तिथे अवघ्या सात दिवसांच्या कालावधीत दुसऱ्यांदा सोन्याची खाण खचून मोठा भीषण अपघात झाला.
Sudan Gold Mine Accident 11 Dead
Sudan Gold Mine AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Sudan Gold Mine Accident 11 Dead: आफ्रिकन देश सुदानमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून तिथे अवघ्या सात दिवसांच्या कालावधीत दुसऱ्यांदा सोन्याची खाण खचून मोठा भीषण अपघात झाला. या ताज्या दुर्घटनेत मलब्याखाली दबल्यामुळे 11 कामगारांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून 30 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. रेड सी राज्यातील ओनी भागातील एका सोन्याच्या खाणीत शनिवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

खाण हळूहळू खचत असल्याचे निदर्शनास येऊनही मजुरांनी धोका पत्करुन काम सुरुच ठेवले होते, ज्यामुळे हा मोठा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. मलब्याखाली अद्यापही काही मजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून शोधमोहीम वेगाने राबवली जात आहे. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Sudan Gold Mine Accident 11 Dead
Sudan Attack: सुदान पुन्हा हादरलं! जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्यांवरच काळाचा घाला; गोळीबारात 8 मुलांसह 24 निष्पाप नागरिकांचा मृत्यू

सुदानी मिनरल रिसोर्सेस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून 30 जखमींना वाचवण्यात आले. कंपनीने या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना खाण मालकांकडून योग्य भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च कंपनी उचलणार आहे. विशेष म्हणजे अवघ्या पाच दिवसांपूर्वीच सुदानच्या पश्चिम भागात अशीच एक सोन्याची (Gold) खाण खचून तब्बल 82 मजुरांना आपला जीव गमवावा लागला होता. सततच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Sudan Gold Mine Accident 11 Dead
Sudan Drone Attack: सुदानमध्ये क्रूरतेचा कळस! अल-फाशर येथील मशिदीवर ड्रोन हल्ला; 75 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

सुदानमध्ये सोन्याच्या मोठ्याप्रमाणावर खाणी असून लाखो लोक या क्षेत्रात रोजगारासाठी काम करतात. मात्र, सुरक्षेच्या अत्यंत तुटपुंज्या उपाययोजना आणि नियमांचे उल्लंघन यामुळे येथे वारंवार असे जीवघेणे अपघात घडतात. पावसाळ्यात खाणींमध्ये पाणी साचत असतानाही काम सुरु ठेवले जाते, तसेच जास्त पैशांच्या लालसेने मजूर क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरटाइम करतात. याशिवाय सुदानमध्ये गेल्या तीन वर्षांपासून म्हणजेच एप्रिल 2023 पासून लष्कर आणि निम लष्करी रॅपिड सपोर्ट फोर्सेस यांच्यात भीषण गृहयुद्ध सुरु आहे. या युद्धाने आतापर्यंत 60 हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, या गृहयुद्धाचा खर्च भागवण्यासाठी सुदानमधून मोठ्या प्रमाणावर सोन्याची बेकायदेशीर तस्करीत वाढ झाली, ज्याचा थेट फटका गरीब मजुरांच्या जीवाला बसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com