आनंदी आनंद गडे! अभ्यासातून समोर आले वर्क फ्रॉमचे आश्चर्यकारक फायदे

कोरोना काळात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करुन दिली.
Work From Home
Work From Home Dainik Gomantak
Published on
Updated on

कोरोना काळात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करुन दिली.

यातच आता, ट्रॅकिंग हॅपिनेसच्या अभ्यासात असे समोर आले आहे की, ज्या कर्मचाऱ्यांकडे घरुन काम करण्याची सुविधा उपलब्ध आहे ते अधिक आनंदी असल्याचे सांगतात.

हा अभ्यास महत्त्वपूर्ण होता, कारण ज्या कर्मचाऱ्यांनी पूर्णवेळ घरुन काम केले ते घरातून काम करण्याची सुविधा नसलेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा सरासरी 20 टक्के अधिक आनंदी होते.

दरम्यान या अभ्यासात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या दाव्यानुसार, एखाद्याच्या आयुष्यातील 27 टक्के आनंद हा कामावरील आनंदाने मिळू शकतो. सर्वेक्षणात असे आढळून आले की, प्रवासाच्या वेळा वाढल्याने कर्मचाऱ्यांचा आनंद कमी होतो.

Work From Home
कॅनडाच्या नागरिकांना भारतात 'नो एन्ट्री', सरकारने बंद केली व्हिसा सर्व्हिस

अलीकडेच, आणखी एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, कार्यालयात जावून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा घरुन करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते.

प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या सर्वेक्षनुसार, घरुन काम करणार्‍या यूएस कर्मचार्‍यांनी दैनंदिन कार्यालयात जावून काम करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांपेक्षा 54 टक्के कमी ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनात योगदान दिले.

Work From Home
Canada New Rules: कॅनडामध्ये 'या' लोकांवर घरं खरेदी करण्यावर सरकारची बंदी

तसेच, अभ्यासात पुढे स्पष्ट करण्यात आले आहे की, एक दिवसाच्या वर्क फ्रॉम होममुळे (Work From Home) उत्सर्जनात 2 टक्के घट होऊ शकते, कारण कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहण्याची गरज नाही.

वाहनांच्या वापरातील ही घट ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जनात घट होण्यास हातभार लावेल अशी अपेक्षा आहे. कर्मचाऱ्यांनी (Employees) आठवड्यातून दोन किंवा चार दिवस घरुन काम केले तर, त्यांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांच्या तुलनेत त्यांचे उत्सर्जन 29 टक्के कमी होऊ शकते.

अहवालात पुढे असेही सांगण्यात आले की, उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने दोन प्रमुख पैलूंना प्राधान्य दिले पाहिजे:1 वाहतुकीचे डीकार्बोनायझेशन आणि ऑफिस हीटिंग आणि कूलिंगसाठी अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा अवलंब.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com