अमेरिकेतील (USA) नॉर्थ डेट्रॉईट येथील शाळेत एका 15 वर्षीय विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात (America Firing)तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असुन किमान 8 जण जखमी झाले आहेत. अमेरिकेतील शाळेत या वर्षातील गोळीबाराची ही सर्वात क्लेशदायक घटना असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींमध्ये एका शिक्षकाचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑक्सफर्ड टाऊनशिपमधील ऑक्सफर्ड हायस्कूलमध्ये (Oxford High School) एक बंदूकधारी असल्याची माहिती पोलिसांना रात्री 12:55 च्या सुमारास मिळाली. ऑकलंड काउंटी शेरीफ कार्यालयाने सांगितले की मृतांमध्ये एक 16 वर्षांचा विद्यार्थी, एक 14 वर्षांचा आणि एक 17 वर्षांचा आहे. त्याचबरोबर जखमींपैकी 6 जणांची प्रकृती स्थिर असून दोन जणांवर शस्त्रक्रिया सुरू आहेत.(Student opened fire in Oxford high school in USA)
एका संशयिताला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे . मात्र, या गोळीबाराचे कारण काय आहे हे अद्याप सांगण्यात आले नाही . संशयित विद्यार्थ्याने अटकेच्या वेळी विरोध केला नाही आणि घटनेमागील कारणाबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही. आरोपीने वकिलाची मागणी देखील केली असल्याची माहिती मिळत आहे.
शेरीफच्या कार्यालयाने सांगितले की त्यांना वाटत नाही की एकापेक्षा जास्त हल्लेखोर आहेत. दुपारी पोलिसांच्या 911 आपत्कालीन क्रमांकावर 100 हून अधिक कॉल आले आणि 5 मिनिटांत शूटरने सुमारे 15-20 राउंड फायर केले. पहिल्या इमर्जन्सी कॉलच्या 5 मिनिटांत संशयिताला अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे बायडन यांनी ट्विट करत, "ऑक्सफर्ड, मिशिगन घटनेत आपल्या प्रियजनांना गमावल्याच्या अकल्पनीय दु:खात मी कुटुंबियांसोबत उभा आहे. शाळेतील या दुःखद गोळीबाराच्या घटनेबाबत मी माझ्या टीमच्या संपर्कात आहे."अशी भावना व्यक्त केली आहे.
पोलिस संशयित विद्यार्थ्याच्या कुटुंबाच्या संपर्कात असून त्याच्या घराचीही झडती घेतली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे . आरोपी विद्यार्थी मंगळवारीही वर्गात आला होता. तथापि, या अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आले होते की त्यांना अनावधानाने गोळीबारात मारण्यात आले होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संशयित याबाबत बोलत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वर्षी अमेरिकेच्या शाळांमध्ये 138 गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये 26 वेळा लोकांचा मृत्यू झाला, जरी या वर्षी एका घटनेत दोनपेक्षा जास्त मृत्यू झाले नाहीत. अमेरिकेच्या इतिहासातील गोळीबाराची सर्वात क्लेशदायक घटना व्हर्जिनियातील ब्लॅक्सबर्ग येथील व्हर्जिनिया टेक येथे घडली आहे. एप्रिल 2007 मध्ये झालेल्या गोळीबारात शूटरसह 33 जणांचा मृत्यू झाला होता. फेब्रुवारी 2018 मध्ये, पार्कलँड, फ्लोरिका येथील एका हायस्कूलमध्ये एका व्यक्तीने AR-15 असॉल्ट रायफलने गोळीबार केला आणि 17 जण ठार झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.