पेंगोंग तलावावर पूल बांधल्याने चीनचा काय फायदा?

चीन पेंगोंगे तलावावर पूल बांधत असून भारत आणि चीनमध्ये या पुलावरून वाद वाढत चालला आहे.
china
china Dainik Gomantak
Published on
Updated on

भारत (India) आणि चीन (China) यांच्यात पूर्व लडाखमध्ये 20 महिन्यांहून अधिक काळ संघर्ष सुरु आहे. दोन्ही देश नियंत्रण रेषेजवळ पायाभूत सुविधा मजबूत करण्यात गुतंली आहेत. चीन पेंगोंगे तलावावर पूल बांधत आहे. सॅटेलाईट इमेजमध्ये हा पूल दिसत आहे. या पुलावरून दोन्ही बाजूमधील वाद वाढत चलला आहे.

* पूल बांधण्याचे काम कुठे सुरु?

चीन पेंगोंग तलावाच्या (Pangong Lake) उत्तर किनाऱ्यावर सुमारे 400 मीटर लांब आणि 8 मीटर रुंद पूल बांधत आहे. वास्तविक नियंत्रण रेषा येथून अगदी जवळ आहे. या पुलाच्या बांधकामामुळे चीनला वेगाने सैन्य तैनात करणे सोपे होणार आहे. हा पूल फिगर 8 पासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे. हा पूल जिथे बांधला जात आहे ती जमीन भारताची असली तरी ती 1958 पासून चीनच्या ताब्यात आहे. पेंगोंग तलाव हे सुमारे 135 किमी लांबीचा तलाव आहे. या सरोवराचा व तृतीयांशभाग चीनच्या (China) ताब्यात आहे.

या पुलाची चीनला कशीही मदत होणार?

या पुलाच्या माध्यमातून चीनला पेंगोंग तलावाच्या दोन्ही बाजूला सैन्य तैनात करायचे आहे. कैलास रांगेपासून या पुलाचे अंतर सुमारे 35 किलोमीटर आहे. भारताने कैलास पर्वतरांगा आपल्या ताब्यात घेतल्यावर चिनी सैनिक तेथे उशिरा पोहोचले असे अहवालात म्हंटले आहे. तेथे जाण्यासाठी त्यांना चुशुलच्या दुर्गम भागातून जावे लागले.हा पूल तयार झाल्लानंतर चिनी सैनिक 12 तासांऐवजी 4 तासात केलास पर्वतरांगात पोहोचू स शकतात. भारताने (India) कैलास पर्वतरांगावर ताबा मिळवल्यानंतर चीनने अनेक नवीन रस्ते बांधल्याचे अहवालात म्हंटले आहे. या पुलाच्या माध्यमातून अधिक चांगली आणि जलद कनेक्टिव्हिटी हवी आहे.

china
असं काय घडलं! न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी रद्द केलं स्वत:चंच लग्न

* भारताचे यावर मात

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिदम बागची यांनी सांगितले की, सरकार पूल बांधणीच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ते म्हणाले होते की, हा पूल अशा भागात बांधला जात आहे जो जवळपास 60 वर्षांपासून बेकायदेशीरपने चीनच्या ताब्यात आहे. सरकार सुरक्षितेतच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलत आहे. सीमेजवळील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी बजेटमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. अनके रस्ते आणि पूल बांधले गेले आहेत आणि अनके बंधकले जात आहेत.

* दोन्ही देशांमध्ये वाद निर्माण झाला

पुलावरून दोन्ही देशात वाद निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून आतापर्यत १४ वेळा बैठका घेतल्या आहेत. डेमचोकमध्ये, काही नागरिकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताच्या बाजूने तंबू ठोकले आहेत आणि ते खाली करण्यास नकार दिला आहे. दोन्ही बाजूंकडे दारुगोळा आणि ५० हजाराहुन अधिक सैनिक अनेक अवजड शस्त्रास्त्रांसह या भगत तैनात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com