Khartoum News: अनेक मुस्लिम देशांमध्ये उत्खननादरम्यान मंदिरांचे पुरावे सापडले आहेत. या क्रमवारीत सुदान या मुस्लिम देशात 2 हजार 700 वर्ष जुन्या मंदिराचे अवशेष सापडले आहेत.
दरम्यान, सुदानमध्ये (Sudan) पुरातत्वशास्त्रज्ञांनी शोधलेल्या मंदिराचे अवशेष 2700 वर्षे जुने आहेत. हे मंदिर त्या काळातील आहे, जेव्हा या भागात कुश नावाचे एक मोठे राज्य अस्तित्वात होते. या राज्यामध्ये सध्याचे सुदान, इजिप्त (Egypt) आणि मध्यपूर्वेतील काही भाग समाविष्ट होते.
तसेच, जुन्या डोंगोलाच्या मध्ययुगीन किल्ल्यामध्ये मंदिराचे अवशेष सापडले आहेत. हे ठिकाण आधुनिक सुदानमधील नाईल नदीच्या धबधब्याजवळ आहे. मंदिरातील काही दगड आकृत्या आणि चित्रलिपी शिलालेखांनी सजवलेले होते.
प्रतिमाशास्त्र आणि लिपींचे विश्लेषण सूचित करते की, ते बीसीईच्या पहिल्या सहस्राब्दीच्या सुरुवातीच्या संरचनेचा भाग होते. युनिव्हर्सिटी ऑफ वॉर्सा येथील पोलिश सेंटर ऑफ मेडिटेरेनियन आर्कियोलॉजीच्या पुरातत्वशास्त्रज्ञांनी एका निवेदनात म्हटले आहे की, हा शोध आश्चर्यकारक होता, कारण जुन्या डोंगोला येथून 2,700 वर्षांपेक्षा जुने काहीही सापडले नाही.
मंदिराच्या काही अवशेषांच्या आत, पुरातत्वशास्त्रज्ञांना शिलालेखांचे तुकडे सापडले आहेत. यापैकी एकानुसार हे मंदिर कावाच्या अमुन-रा चे होते. संशोधन टीमच्या मते, अमुन-रा ही कुश आणि इजिप्तमध्ये पूजली जाणारी देवता होती आणि कावा हे सुदानमधील पुरातत्व स्थळ आहे, ज्यामध्ये मंदिर आहे. नुकतेच सापडलेले अवशेष त्याच मंदिराचे आहेत की, अन्य कोणाचे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
याशिवाय, सुदानमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करणाऱ्या ज्युलिया बुडका यांनी लाइव्ह सायन्सला ईमेलमध्ये सांगितले की, हा एक अतिशय महत्त्वाचा शोध आहे, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. पण मंदिराची नेमकी वेळ निश्चित करण्यासाठी आणखी संशोधनाची गरज असल्याचे त्यांचे मत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.