New Delhi: दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल 2021 च्या हिवाळ्यात एक गूढ उकलण्यात व्यस्त होते. पश्चिम दिल्लीतील एका व्यावसायिकाच्या वॉलेटमधून तब्बल 4 कोटी रुपयांची क्रिप्टोकरन्सी चोरीला गेली होती.
ज्या वॉलेट आयडींमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते, त्यातील काही आयडी शोधण्यात पोलिसांना यश आले, परंतु खरे गुन्हेगार सापडले नाहीत. त्याचवेळी, इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने भारतीय गुप्तचर संस्थांना संदेश पाठवला होता.
अशा प्रकारची गुप्तचर देवाणघेवाण दोन्ही देशांदरम्यान होते. या संदेशात काही संशयास्पद वॉलेटची माहिती होती, जी दहशतवादी संघटना वापरत होती. मोसादच्या यादीत समाविष्ट असलेले अनेक वॉलेट अॅड्रेस हमासच्या अल-कसाम ब्रिगेडद्वारे चालवले जात होते.
इस्रायलच्या नॅशनल ब्युरो फॉर काउंटर टेररिस्ट फायनान्सिंगने त्यांना 'सीज' केले होते. स्पेशल सेलच्या इंटेलिजेंस फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑप्स (IFSO) युनिटने वॉलेट आयडीशी मॅच केल्यावर या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला.
दिल्लीहून (Delhi) ज्या वॉलेटमधून बिटकॉइन आणि इथरियम ट्रान्सफर करण्यात आले होते, ते हमासच्या सायबर दहशतवाद शाखेद्वारे चालवले जात होते.
दरम्यान, दिल्ली प्रकरण हे भारतातील हमासच्या कोणत्याही हालचालीची पहिलीच घटना होती. तपासासंबंधीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्याचे स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते.
माजी डीसीपी (स्पेशल सेल) केपीएस मल्होत्रा यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला होता. मंगळवारी मल्होत्रा म्हणाले की, 'होय, आमच्या तपासात आम्हाला अल-कासम ब्रिगेडशी संबंधित बरीच वॉलेट सापडली होती.'
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची तक्रार 2019 मध्ये पश्चिम विहार पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास स्पेशल सेलकडे सोपवण्यात आला होता.
हमासशी संबंध उघडकीस आल्यानंतर, टेक्निकल एनालिसिसमध्ये असे दिसून आले की, सीज केलेले वॉलेट्स गाझास्थित नासिर इब्राहिम अब्दुल्लाचे आहे, तर दुसरे गिझाच्या अहमद मारझूक सारख्या हमास कार्यकर्त्याचे आहे… पॅलेस्टाईनच्या अहमद क्यूएच सैफीचे वॉलेटही सीज करण्यात आले होते.
हमासने (Hamas) शनिवारी इस्रायलवर हल्ला केला. त्यानंतर इस्रायलने जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल समर्थक देशांमध्ये हॅकिंगच्या माध्यमातून निधी उभारण्याच्या हमासच्या नव्या रणनितीमुळे गुप्तचर यंत्रणा चक्रावून गेल्या आहेत.
मंगळवारी, इस्रायली पोलिसांच्या सायबर युनिटने निधी गोळा करण्यासाठी वापरल्या जाणार्या हमासची अनेक क्रिप्टो खाती गोठवली.
इस्रायली अधिकाऱ्यांनी Binance सारख्या क्रिप्टो एक्सचेंजेसला सीज केलेला फंड्स संबंधित देशाच्या सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आवाहन केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.