Ladder To Heaven बेतलं जीवावर, दरीत पडून ब्रिटीश पर्यटकाचा मृत्यू

इंस्टाग्रामवर ही शिडी खूप लोकप्रिय आहे.
Stairway To Heaven Accident
Stairway To Heaven Accident
Published on
Updated on

Stairway To Heaven Accident: स्वर्गात जाणारी शिडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिडीवरुन दरीत पडलेल्या ब्रिटिश पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. 300 फूट उंचीवरून पर्यटकाचा पाय घसरला आणि दरीत कोसळून त्याचा मृत्यू झाला. ऑस्ट्रियामध्ये 12 सप्टेंबर रोजी ही घटना घडली.

पर्यटक खाली पडल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी पोलीस अधिकारी आणि दोन हेलिकॉप्टर घटनास्थळी रवाना करण्यात आले. मात्र, त्या व्यक्तीचा जीव वाचला नाही. त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. मेट्रोने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

'इंस्टाग्रामवर ही शिडी खूप लोकप्रिय आहे. हा हवाई जिना स्थानिक भाषेत 'स्वर्गाकडे जाणारा जिना' म्हणून ओळखला जातो. रिपोर्टनुसार, मृत व्यक्ती एकटाच शिडीवर चढाई करत गेला यावेळी तिथे इतर कोणीही पर्यटक उपस्थित नव्हते. या शिडीवर चढण्यासाठी चार टप्पे केले जाते.

स्टेअरवे टू हेव्हन आउटडोअर लीडरशिपने व्यावसायिक गिर्यारोहक हेली पुट्झ यांच्या सहकार्याने बांधला आहे. शिडी केवळ अनुभवी गिर्यारोहकांसाठी आहे अशी सूचना करण्यात आली आहे तसेच, शांत हवामान आणि वारा नसेल त्यावेळीच चढाई करावी असाही सल्ला देण्यात आला आहे. मात्र काहीजण त्याचे पालन करत नाहीत.

दरम्यान, अपघात घडला त्यावेळी पर्यटकाने योग्य काळजी घेतली नाही. तसेच, सूचनांचे पालन केले नाही. त्यामुळे हा अपघात झाला असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com