Srilanka Crisis: श्रीलंकेचा नवा राष्ट्रपती कोण? आज होणार मतदान

श्रीलंकेतील राष्ट्रपती निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच त्रिशंकु होणार आहे.
Sri Lanka Crisis
Sri Lanka CrisisDainik Gomantak
Published on
Updated on

भारताचा शेजारी श्रीलंकेत मागील काही दिवसांपासून गृहयुद्ध पहायला (Srilanka Crisis) मिळत आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे. देश आर्थिक संकटात सापडला असताना माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी देशातून पळ काढला. आंदोलनकर्ते यांनी गोटाबाया यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. अखेर गोटाबायांनी राजीनामा दिल्यानंतर आज (मंगळवार, दि.20) श्रीलंकेच्या नव्या राष्ट्रपतीपदासाठी (Presidential Election) मतदान होत आहे. त्यामुळे देशाची आर्थिक स्थिती बिकट असताना श्रीलंकेचा नवा राष्ट्रपती कोण होणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

श्रीलंकेतील राष्ट्रपती निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच त्रिशंकु होणार आहे. पंतप्रधान आणि काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष रनिल विक्रमासिंघे (Ranil Wickremesinghe), दलस अलापेरुमा (Dullas Alahapperuma) आणि नॅशनल पीपुल्स पॉवर पार्टीचे अनुरा कुमार दिसानायके (Anura Dissanayake) हे तिघेजण रिंगणात आहेत. नव्या राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ 2024 मध्ये संपणार आहे. त्यामुळे निवडून येणारे नवे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया यांचा उर्वरित कालावधी पूर्ण करेल. नव्या राष्ट्रपती निवडणूकीत आज संसदेचे 225 खासदार मतदान करतील. या निवडणूकीकडे भारतासह सर्व जगाचे लक्ष लागले आहे.

Sri Lanka Crisis
Sri Lanka: पोटाची खळगी भरण्यासाठी श्रीलंकन महिलांना करावी लागतेय देहविक्री

भारताकडे मदतीसाठी आवाहन

श्रीलंकेचे विरोधीपक्षनेते सजिथ प्रेमदासा (Sajith Premadasa) यांनी भारताकडे मदतीची अपेक्षा केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत ट्विट केले आहे. 'उद्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत कोणीही राष्ट्रपती झाले तरी, लंकेला या आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी भारताने मदत करावी. यासाठी माझी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतातील सर्व राजकीय पक्ष आणि जनतेला कळकळीची विनंती आहे.'

परकीय चलनाचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर श्रीलंकेची आर्थिक स्थिती कोलमडून पडली. महागाई, वीज समस्या, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा यामुळे त्रस्त झालेले नागरिक चांगलेच आक्रामक झाले आहे. अशात नागरिकांना आंदोलन करत राष्ट्रपती माजी राष्ट्रपती राजपक्षे गोटाबाया यांच्या शासकिय निवासस्थानाचा नागरिकांनी ताबा घेतला. गोटाबाया जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोवर निवासस्थान सोडणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. गोटाबाया यांना अखेर नमत घ्यावं लागले आणि त्यांनी राजीनामा दिला.

श्रीलंकेत यापार्श्वभूमीवर अनेक दिवस हिसंक आंदोलने पहायला मिळाली. यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला तर, जवळपास 84 लोक जखमी झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Sri Lanka Crisis
पंचायत निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘आरजी’चे समर्थन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com