Eggs Import: 'या' देशात पुन्हा अन्नटंचाई! भारतातून मागवली 20 लाख अंडी

Sri Lanka Imported 2 Million Eggs From India: कठीण प्रसंगी शेजारीच कामी येतो. भारताने संकटात अडकलेल्या देशाला मदत करुन हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
Eggs
Eggs Dainik Gomantak

Sri Lanka Imported 2 Million Eggs From India: कठीण प्रसंगी शेजारीच कामी येतो. भारताने संकटात अडकलेल्या देशाला मदत करुन हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

येथे आपण आर्थिक संकट आणि परदेशी कर्जाने दबलेल्या श्रीलंकेबद्दल बोलत आहोत, ज्याच्या सरकारने आपल्या लोकांना खायला देण्यासाठी भारतातून 2 दशलक्ष अंडी मागवली आहेत.

आत्तापर्यंत अंड्यांची ही सर्वात मोठी खेप श्रीलंकेत पोहोचली आहे. कोलंबो प्रशासनाचे म्हणणे आहे की, लवकरच संपूर्ण साठा बाजारात विक्रीसाठी पोहोचेल. याआधीही श्रीलंकेत अंड्यांचा तुटवडा होता, मात्र भारतातून ती आयात केली जात नव्हती.

संसदेत माहिती दिली

श्रीलंकेचे व्यापार मंत्री नलिन फर्नांडो यांनी संसदेत (Parliament) सांगितले की, स्टेट ट्रेडिंग जनरल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून भारतातून 20 दशलक्ष अंडी आयात करण्यात आली आहेत. ज्याची खेप पुढील 72 तासांत संपूर्ण श्रीलंकेच्या बाजारपेठेत पाठवली जाईल.

फर्नांडो यांनी असेही निदर्शनास आणून दिले की, अंडी आयात करण्याचा निर्णय अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कॅबिनेट समितीच्या निर्णयावर आधारित होता.

Eggs
Sri Lanka Economic Crisis: लंकेची आर्थिक स्थिती सुधारणार, राष्ट्रपतींनी खर्च कमी करण्याचे दिले आदेश

अंडी आयात

जानेवारीच्या सुरुवातीला जेव्हा बाजारात अंड्यांचा तुटवडा होता, तेव्हा श्रीलंकेच्या पशु उत्पादन आणि आरोग्य विभागाने भारत (India) आणि पाकिस्तानमधून अंडी आयात करण्यास मान्यता देण्यास नकार दिला होता, कारण दोन्ही देशांमधून मागील सहा महिन्यात बर्ड फ्लूची प्रकरणे समोर आली होती.

सरकार विरोधकांवर नाराज

दुसरीकडे, श्रीलंकेच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. गेल्या वर्षभरापासून याबाबत ओरड सुरु आहे. सिलिंडर, राशनची विक्री आणि वितरण लष्कराला करावे लागले. मोठ्या कष्टाने परिस्थिती कशीतरी नियंत्रणात आली आहे.

Eggs
Sri Lanka Financial Crisis: श्रीलंकेतील आर्थिक संकट आणि भारताची भूमिका

दरम्यान, श्रीलंकेच्या सरकारने कोलंबोमध्ये परदेशी राजदूतांसोबत बैठका घेऊन आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या महत्त्वाच्या बेलआऊट कार्यक्रमाला कमजोर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांवर केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com