श्रीलंकेत विद्यार्थ्यांना शिकावी लागणार हिंदी आणि चिनी भाषा, राष्ट्राध्यक्ष विक्रमसिंघे यांनी सांगितले कारण

भविष्यासाठी तयार होताना श्रीलंकेतील शिक्षणात फेरबदल करणे आवश्यक आहे - राष्ट्राध्यक्ष
Ranil Wickremesinghe
Ranil WickremesingheDainik Gomantak
Published on
Updated on

श्रीलंकेतील विद्यार्थ्यांना आता हिंदी आणि चिनी भाषाचेही धडे घ्यावे लागणार आहेत. बदलत्या जगाशी जुळवून घेण्यासाठी भविष्यात इंग्रजीशिवाय हिंदी आणि चिनी भाषाही शिकावी लागेल. असे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी म्हटले आहे.

भविष्यासाठी तयार होताना श्रीलंकेतील शिक्षणात फेरबदल करणे आवश्यक आहे. नवीन विषय मांडावे लागतील, विविध भाषाही शिकाव्या लागतील. असे विक्रमसिंघे यांनी कोलंबो येथील एका शाळेतील कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे.

श्रीलंकन ​​मुलांना शाळांमध्ये दुसरी भाषा म्हणून इंग्रजी भाषेचे धडे दिले जातात. पण, बदलत्या शिक्षण प्रवाहामुळे, विद्यापीठ प्रवेश परीक्षांसाठी हिंदी आणि चिनी भाषा शिकणारी अनेक मुले आहेत.

"आम्हाला नवीन पिढी अल्फामध्ये बसण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित नवीन विषय सादर करावे लागतील. शाळांमधील विद्यार्थ्यांना मोबाईल फोन आणि पॉडकास्टद्वारे शिक्षण द्यावे लागेल. शाळा आणि विद्यापीठांमध्ये आपल्याला जीनोम तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स शिकवावे लागेल." असे विक्रमसिंघे यांनी म्हटले आहे.

Ranil Wickremesinghe
MLA Antonio Vas Mother Passes Away: कुठ्ठाळीचे आमदार आंतोनीयो वाझ यांच्या आईचे निधन

नवीन तंत्रज्ञानामुळे भविष्यात 1.5 ट्रिलियन डॉलरचा जागतिक महसूल मिळेल. श्रीलंकेला त्याचा भाग होण्याशिवाय पर्याय नाही. असे विक्रमसिंघे म्हणाले.

हवामान बदलाचा संदर्भ देत, श्रीलंकेला पुढील 20 वर्षांत पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. असे विक्रमसिंघे यांनी सांगितले.

"आम्हाला हवामान बदल कार्यक्रमाला गती द्यावी लागेल आणि संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जगासोबत चालले पाहिजे." असेही त्यांनी नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com