Viral Video: जो खिलाफ है मेरे मैं उनके विरुद्ध तो नही, पर हाँ... प्रदर्शन करणाऱ्या महिलेसमोर उभा ठाकला तिचाच पोलिस पती; पाहा सुंदर व्हिडिओ

Spanish couple protest viral: स्पेनमधील प्रसिद्ध 'व्होल्टा ए एस्पान्या' ही सायकल शर्यत पॅलेस्टाईन समर्थक आंदोलनामुळे अंतिम टप्प्यातच रद्द करावी लागली
spain viral protest video
spain viral protest videoDainik Gomantak
Published on
Updated on

जो खिलाफ है मेरे मैं उनके विरुद्ध तो नही, पर हाँ... उनके साथ भी नही हूँ!

स्पेनमधील प्रसिद्ध 'व्होल्टा ए एस्पान्या' ही सायकल शर्यत पॅलेस्टाईन समर्थक आंदोलनामुळे अंतिम टप्प्यातच रद्द करावी लागली. इस्त्रायली टीमच्या सहभागाला विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. याच घटनेदरम्यान एक पोलीस अधिकारी आणि त्याची पत्नी यांच्यातील अनोख्या संघर्षाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे.

पती सरकारच्या बाजूने, पत्नी विरोधात

रविवारी सायकल शर्यतीदरम्यान, एक महिला आंदोलन करत असताना तिचाच पती पोलीस गणवेशात तिला अडवण्याचा प्रयत्न करत होता. हा व्हिडीओ एका नेटकऱ्याने सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, "पत्नी सरकारच्या विरोधात उभी आहे, तर पती सरकारसाठी उभा आहे. हा एक कमालीचा नजारा आहे." हा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला असून, पती-पत्नीमधील वैचारिक मतभेद एकाच ठिकाणी, एकाच वेळी समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

शर्यत झाली रद्द, राजकीय वाद सुरू

या गदारोळात दोन आंदोलकांना अटक करण्यात आली, तर २२ पोलीस अधिकारी जखमी झाले. पॅलेस्टाईन समर्थक आंदोलकांनी अनेक ठिकाणी रस्त्यावर अडथळे उभे केले. त्यामुळे आयोजकांनी शर्यत रद्द झाल्याची घोषणा केली.

spain viral protest video
Viral Video: 1997 साली जमिनीखाली गाडलं गेलेलं जलजीराचे पॅकेट 27 वर्षानंतर जसंच्या तसं सापडलं, नेटकरी म्हणाले, 'Don't Use Plastic'

या आंदोलनामुळे स्पेनच्या राजकारणात तीव्र मतभेद समोर आले आहेत. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी आंदोलकांचे कौतुक केले. यावर, इस्त्रायलचे परराष्ट्र मंत्री गिडियन सार यांनी सांचेझ यांच्यावर 'आंदोलकांना चिथावल्याचा' आरोप करत त्यांना 'स्पेनसाठी लाजिरवाणी गोष्ट' म्हटले आहे. माद्रिदचे महापौरांनीही सांचेझ यांनाच या हिंसेसाठी जबाबदार धरले आहे.

खेळ आणि राजकारण यांचा संघर्ष

गाझा पट्टीतील इस्त्रायलच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन 'इस्त्रायल-प्रीमियर टेक' संघाला लक्ष्य करत होते. गाझा संघर्षामुळे जागतिक स्तरावर अनेक क्रीडा स्पर्धांवर परिणाम झाला आहे. काही दिवसांपूर्वीच स्पेनमधील एका बुद्धिबळ स्पर्धेतून सात इस्त्रायली खेळाडूंनी माघार घेतली होती. या सर्व घटनांमुळे राजकारण आणि क्रीडा क्षेत्रातील वाढता संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com