संग्रहालयात आलेल्या विद्यार्थ्याला लागली भूक, पठ्ठ्याने जे केलं त्यापायी व्यवस्थापनाने गमावले 1 कोटी

ही घटना दक्षिण कोरियाची राजधानी सियोल येथील एका संग्रहालयात घडली आहे.
south korea Video viral
south korea Video viralDainik Gomantak
Published on
Updated on

एखाद्याला भूक लागली की त्याला जे समोर दिसेल ते खायला तो तयार असतो. अनेक चित्रपटांमध्ये आपण अनेकदा लोकांना कच्चे मांस खाताना पाहतो. कारण त्यांना खायला मिळत नाही. अलिकडेच एका दक्षिण कोरियातील विद्यार्थ्यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो विद्यार्थी खुप भूक लागल्यामुळे एक केळं खातांना दिसत आहे, पण त्या केळाची किमंत 98 लाख रुपये होती. ही घटना दक्षिण कोरियाची राजधानी सियोल येथील एका संग्रहालयात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक मुलगा नाश्ता न करता सियोलमधील एका संग्रहालयाला भेट देण्यासाठी आला होता. संग्रहालयात फिरताना त्याला अचानक खुप भूक लागली होती म्हणून त्याने संग्रहालयातील भिंतीवर लावलेले केळं खाल्ले होते. पण त्याने खाल्लेल्या केळाची किंमत तब्बल 98 लाख रुपये इतकी होती.

दक्षिण कोरियाची राजधानी सियोल येथील लेउम म्युझियम ऑफ आर्टमध्ये इटालियन कलाकार मॉरिझियो कॅटेलन यांची एक कलाकृती प्रदर्शित करण्यात आली आहे. या कलाकृतीमध्ये टेपच्या साहाय्याने एक केळं भिंतीवर चिकटवण्यात आले होते.

हे आर्ट पाहण्यासाठी नोह हुईन सू नावाचा विद्यार्थी आला होता. त्याला भिंतीवर चिटकवलेलं केळं दिसताच त्याने ते खायला सुरुवात केली. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

त्या विद्यार्थ्याने केळी खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा अर्ध केळं भिंतीवर चिकटवले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ त्याच्या मित्राने रेकॉर्डिंग केले होते. संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी केळी का खाल्ली असे विचारले असता, त्या विद्यार्थ्याने असे उत्तर दिले की त्याने नाश्ता केला नव्हता आणि त्यामुळे त्याला भुक लागली होती.

संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्याला कोणतीही शिक्षा न करता जाऊ दिले आहे. दरम्यान, संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दुसरे केळं आणून भिंतीवर लावले. म्युझियमचे लोक तीन दिवसांनी मॉरिझिओच्या कलाकृतीत वापरलेली केळं बदलत असतात अशी माहिती दिली.

यापुर्वी देखील अशा घटना समोर आल्या आहेत अशी माहिती मिळाली आहे. मग या पेंटिंगमधून दररोज दोन केळी बदलली जातात, त्यामुळे चिंतेची बाब नाही, असेही सांगण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com