Russia Ukraine War: युद्धादरम्यान युक्रेन सरकारवर सैनिकांचा रोष; भरतीबाबत नियमांमध्ये मोठे बदल

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. रशिया सातत्याने युक्रेनच्या शहरांना लक्ष्य करत आहे.
Ukraine Women Soldiers
Ukraine Women SoldiersDainik Gomantak
Published on
Updated on

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. रशिया सातत्याने युक्रेनच्या शहरांना लक्ष्य करत आहे. काही दिवसांपूर्वी युक्रेनच्या खार्व्हिव शहरावर रशियाने हवाई हल्ला केला होता. याचदरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. युक्रेनमध्ये सैन्य भरतीसंदर्भात नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. अल जझीराच्या वृत्तानुसार, सैनिकांचे म्हणणे आहे की, आता त्यांना अपंग होईपर्यंत किंवा त्यांना प्राण गमवावे लागेपर्यंत सैन्यात सेवा करावी लागेल. खरे तर, नव्या नियमांमध्ये सेवेची मर्यादा रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी युक्रेनमध्ये 36 महिने सेवा अनिवार्य करण्यात आली होती. रशियाच्या आक्रमक वृत्तीमुळे युक्रेनमध्ये सैनिकांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत युक्रेनच्या संरक्षण विभागाने 5 लाख सैनिकांची भरती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

दरम्यान, युक्रेनच्या संसदेत गुरुवारी सक्तीच्या भरतीबाबत कायदा लागू करण्यात आला. या कायद्याबाबत वाद आहे. कायद्याचा प्रारंभिक मसुदा रद्द करण्यासाठी हजारो दुरुस्त्या करण्यात आल्या, परिणामी अनेक महिने विलंब झाला. या कायद्याबाबत खासदारांनीही बराच काळ उदासिनता बाळगली. हा कायदा लोकांना आवडणार नाही, असा अंदाज आधीच वर्तवला जात होता.

Ukraine Women Soldiers
Russia-Ukraine War: रशियाचा युक्रेनच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या शहरावर हवाई हल्ला; 6 ठार, 10 हून अधिक जखमी

लष्कराचे माजी कमांडर व्हॅलेरी झालुझनी यांच्या विनंतीवरून हा कायदा तयार करण्यात आला आहे, ज्यांनी सैन्याच्या विविध पदांना बळकट करण्यासाठी 5,00,000 नवीन भरती आवश्यक असल्याचे सांगितले होते. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर देशात आघाडीवर असलेल्या सैनिकांची कमतरता आहे. युक्रेनियन लोकांनी नवीन कायद्याच्या मसुद्यात फारसा रस दाखवला नाही.

Ukraine Women Soldiers
Russia-Ukraine War: ''मला चटके देण्यात आले, 16 दिवस खायला दिले नाही''; रशियातून परतलेल्या मुकेश सांगितली आपबिती

दुसरीकडे, या कायद्यानंतर युक्रेनियन अधिकाऱ्यांचे अधिकार वाढतील जे सध्याच्या व्यवस्थेत अनेक बदल घडवून आणतील. आउटगोइंग आर्मी प्रमुख अलेक्झांडर सिर्स्की आणि युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी ऑडिट केल्यानंतर आकडेवारीचे पुनरावलोकन केले आणि सांगितले की आवश्यक संख्या इतकी जास्त नाही कारण सैन्य व्यवस्थितपणे तैनात केले जाऊ शकते. सक्तीच्या लष्करी भरतीच्या मुद्द्यावरुन जलुझानी यांना पदावरुन बडतर्फ करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com