पाकिस्तानच्या हिल स्टेशनवर बर्फवृष्टीचा कहर; 21 पर्यटकांचा मृत्यू

सरकारने राजधानी इस्लामाबादच्या 64 किमी ईशान्येस असलेल्या मुरीला आपत्तीग्रस्त क्षेत्र घोषित केले आहे.
Snowfall wreaks havoc in Pakistan's hill station
Snowfall wreaks havoc in Pakistan's hill station Dainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर पाकिस्तानमध्ये बर्फाच्या वातावरणात वाहनांमध्ये अडकून सुमारे 21 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 1,000 वाहने अजूनही अडकलेली असताना, सरकारने राजधानी इस्लामाबादच्या 64 किमी ईशान्येस असलेल्या मुरीला आपत्तीग्रस्त क्षेत्र घोषित केले आहे. पाकिस्तानचे (Pakistan) गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, "15 ते 20 वर्षांमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक मुरीमध्ये (Murree) आले, ज्यामुळे मोठे संकट निर्माण झाले." मंत्री म्हणाले की हिल स्टेशनमध्ये सुमारे 1,000 कार अडकल्या होत्या, ज्यामध्ये 21 लोकांचा मृत्यू झाला.

बंद केले रस्ते

वृत्तानुसार, त्यांनी सांगितले की, बचाव कार्यात नागरी प्रशासनाला मदत करण्यासाठी लष्कराच्या प्लाटून आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा सरकारने पर्यटकांची वर्दळ रोखण्यासाठी स्टेशनकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्याची घोषणा केली.

Snowfall wreaks havoc in Pakistan's hill station
चीनच्या शिआन शहरात लॉकडाऊनमुळे लोक अस्वस्थ, निषेध करणाऱ्यांना अटक

पंतप्रधान इम्रान खान यांनी शोक व्यक्त केला

पंतप्रधान इम्रान खान यांनी पर्यटकांच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. एका ट्विटमध्ये खान म्हणाले की, "अशा दुर्घटना रोखण्यासाठी तपास आणि कठोर नियमांचे आदेश देण्यात आले आहेत." माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी लोकांना हिल स्टेशनवर न येण्याचे आवाहन केले.

मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेला बर्फवृष्टी (snowy) नियमित अंतराने सुरू राहिल्याने हजारो पर्यटकांना आकर्षित केले. पर्यटकांच्या प्रचंड गर्दीमुळे अनेक कुटुंबे रस्त्यावरच अडकली आहेत. 100,000 हून अधिक वाहने हिल स्टेशनमध्ये घुसल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मुलांसह संपूर्ण कुटुंब बर्फाच्छादित वाहनांमध्ये मृतावस्थेत पडलेले दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com