Skype: मायक्रोसॉफ्टने घेतला मोठा निर्णय, 22 वर्षांच्या सेवेनंतर स्काईप बंद होणार; कारण काय?

Microsoft Shutting Down Skype: मायक्रोसॉफ्ट हे व्हिडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्म (स्काईप) मे महिन्यापासून कायमचे बंद करणार आहे. यासोबत, 22 वर्षांचा प्रवासही संपेल.
Microsoft Shutting Down Skype
SkypeDainik Gomantak
Published on
Updated on

Microsoft to Shut Down Skype Permanently in May 2025

तुम्ही स्काईप बद्दल ऐकले असेल आणि ते वापरलेही असेल. हे ॲप वापरकर्त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा प्रदान करते. बरेच लोक ऑनलाइन बैठकांसाठी याचा वापर करतात. हे जगातील पहिल्या व्हिडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. मात्र आता, मायक्रोसॉफ्ट हे व्हिडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्म (स्काईप) मे महिन्यापासून कायमचे बंद करणार आहे. यासोबत, 22 वर्षांचा प्रवासही संपेल. स्काईप 2003 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. 2011 मध्ये मायक्रोसॉफ्टने ते विकत घेतले. यानंतर, कंपनीने हळूहळू या प्लॅटफॉर्मच्या काही सुविधा काढून टाकल्या. कंपनीने विंडोज लाईव्ह मेसेंजर काढून टाकले. 2015 मध्ये, मायक्रोसॉफ्टने स्काईपला विंडोज 10 मध्ये इंटीग्रेट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातही अपयश आले. ते नऊ महिन्यातच बंद करावे लागले.

मायक्रोसॉफ्टने प्लॅन बनवला

दरम्यान, मायक्रोसॉफ्टने 2017 मध्ये टीम्स (Teams) लॉन्च केले. कंपनी अंतर्गत संवादासाठी स्लॅक (Slack) सारख्या प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करण्यासाठी टीम्स तयार करण्यात आले. मात्र आता, स्काईप वापरकर्त्यांना टीम्सवर शिफ्ट होण्यास सांगितले जाईल. रिपोर्टनुसार, एका इव्हेंटच्या प्रिव्ह्यूमध्ये असे लिहिले होते की, टीम्सवर तुमचे कॉल आणि चॅट सुरु ठेवा. यासोबतच, तुमचे काही मित्र आधीच टीम्सवर शिफ्ट झाले आहेत.

Microsoft Shutting Down Skype
Microsoft Outage: भारतासह जगभरात मायक्रोसॉफ्ट विंडोजची सेवा विस्कळीत, जाणून घ्या क्राऊडस्ट्राईक म्हणजे काय?

मायक्रोसॉफ्टने स्काईप 8.5 अब्ज डॉलर्संना विकत घेतले

स्काईप पहिल्यांदा 2003 मध्ये लॉन्च करण्यात आले. ते इंटरनेट प्रोटोकॉल (VOIP) प्लॅटफॉर्म म्हणून उदयास आले. 2011 मध्ये मायक्रोसॉफ्टने ते 8.5 अब्ज डॉलर्संना विकत घेतले. तेव्हापासून, मायक्रोसॉफ्टने ॲपलच्या आयमेसेजशी स्पर्धा करण्यासाठी स्काईप अनेक वेळा डिजाइन केले.

Microsoft Shutting Down Skype
Explainer: Microsoft, Amazon, Google च्या मक्तेदारीला धक्का! AI मधील गुंतवणुकीची का होतेय चौकशी?

स्काईपला लोकप्रिय करण्यात कंपनी अपयशी ठरली

मायक्रोसॉफ्टने स्काईपला विंडोज, विंडोज फोन आणि एक्सबॉक्स सारख्या इतर उत्पादनांसह एकत्र करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही वर्षांत, मायक्रोसॉफ्टने स्काईप क्लिप्स आणि कोपायलट एआय सारख्या नवीन फीचर्सचा समावेश करुन स्काईपला पुन्हा लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला. परंतु कोविडकाळात कंपनी स्काईपला लोकप्रिय करण्यात अपयशी ठरली. अशा परिस्थितीत ते आता बंद करण्याची वेळी आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com