SIPRI Report: शस्त्रास्त्र खरेदीत भारत पुन्हा अव्वल, पाकिस्तान आठव्या स्थानावर पोहोचला!

SIPRI Report: स्टॉकहोमस्थित थिंक टँक सिप्रीने सोमवारी जारी केलेल्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
Weapons
WeaponsDainik Gomantak

SIPRI Report: स्टॉकहोमस्थित थिंक टँक सिप्रीच्या एका रिपोर्टची जगभरात चर्चा होत आहे. 2013-17 आणि 2018-22 या कालावधीत भारताची आयात 11 टक्क्यांनी घटली असली तरीही भारत हा जगातील अव्वल शस्त्र आयातदार देश आहे.

स्टॉकहोमस्थित थिंक टँक सिप्रीने सोमवारी जारी केलेल्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, रशियाच्या (Russia) आक्रमणानंतर अमेरिका आणि युरोपकडून लष्करी मदत मिळाल्यानंतर युक्रेन गेल्या वर्षी शस्त्रास्त्रांचा जगातील तिसरा सर्वात मोठा आयातदार बनला, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

सिप्रीचे वरिष्ठ रिसर्च फेलो पीटर वेगेमन यांनी सांगितले की, गेल्या वर्षी शस्त्रास्त्रांच्या आयातीत घट झाली असताना, युरोपीय देशांनी रशियासोबतच्या वाढत्या तणावामुळे शस्त्रास्त्रांच्या खरेदीत वाढ केली.

Weapons
Pakistan Currency: पाकिस्तान आणखी गाळात; डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण

शस्त्रास्त्र खरेदीत भारत अव्वल आहे

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) ने म्हटले आहे की, 2018-22 मध्ये भारत (India), सौदी अरेबिया, कतार, ऑस्ट्रेलिया आणि चीन हे जगातील पाच सर्वात मोठे शस्त्र आयातदार होते.

रिपोर्टनुसार, पाच सर्वात मोठ्या शस्त्रास्त्र निर्यातदारांमध्ये अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन आणि जर्मनी यांचा समावेश आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 2018-22 मध्ये जगातील आठव्या क्रमांकाचा शस्त्रास्त्र आयातदार असलेल्या पाकिस्तानची आयात 14 टक्क्यांनी वाढली असून चीन हा त्याचा मुख्य पुरवठादार आहे.

Weapons
Power Outage In Pakistan: पाकिस्तान अंधारात! मेट्रो, बाजारपेठा ठप्प; सरकारने केली लोकांना 'ही' विनंती

या मुस्लिम देशांतून बरीच शस्त्रे आयात केली गेली

सिप्रीच्या रिपोर्टनुसार, 2018-22 या वर्षात मध्यपूर्वेतील तीन देशांचाही 10 मोठ्या शस्त्रास्त्र आयातदारांमध्ये समावेश करण्यात आला आहे. हे देश सौदी अरेबिया, कतार आणि इजिप्त आहेत. 2018-22 मध्ये सौदी अरेबिया हा जगातील दुसरा सर्वात मोठा शस्त्र आयातदार होता.

Weapons
Pakistan Economic Crisis: आट्यासाठी आटापिटा ! पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात

यादरम्यान सौदीने एकूण शस्त्रास्त्रांच्या आयातीपैकी 9.6 टक्के आयात केली होती. त्याचवेळी, गेल्या 10 वर्षांत कतारच्या शस्त्रास्त्रांच्या आयातीत 311 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यासह, 2018-22 या वर्षात हा जगातील तिसरा सर्वात मोठा आयातदार देश बनला आहे. दुसरीकडे, SIPRI च्या या यादीत पाकिस्तानला शस्त्रास्त्र आयातीच्या बाबतीत 8 वे स्थान देण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com