Tech Layoffs: धक्कादायक! टेक्नॉलॉजी क्षेत्रात या वर्षी दररोज तब्बल 'इतक्या' जणांनी गमावली नोकरी...

जगभरात आर्थिक मंदीचे सावट
Layoffs
LayoffsDainik Gomantak

Tech Layoffs: सन 2023 मध्ये आर्थिक मंदीच्या भीतीमुळे जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. जानेवारीच्या सुरुवातीपासूनच अनेक टेक कंपन्या, युनिकॉर्न आणि स्टार्टअप्सनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. आकडेवारीनुसार, जानेवारीपासून आतापर्यंत या कंपन्यांनी एकूण १.५३ लाख लोकांची छाटणी केली आहे.

Layoffs
Gautam Adani : गौतम अदानी टॉप-30 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर; अदानींकडे शिल्लक राहिली 'एवढीच' संपत्ती

म्हणजेच, वर्षाच्या सुरुवातीपासून दररोज 2700 लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. दुसरीकडे, कर्मचारी कपातीतून वाचलेल्यांना पगारात कपात किंवा पगारात वाढ न होण्याच्या समस्या भेडसावत आहेत.

रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली अस्थिरता, वाढती महागाई आणि जागतिक आव्हाने यामुळे संपुर्ण जगातच अनिश्चिततेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत त्याचा परिणाम कंपन्या आणि नोकऱ्यांवर होत आहे.

जागतिक मंदीच्या भीतीमुळे, कंपन्यांना यावेळी कमीत कमी पैसा खर्च करायचा आहे आणि अशा परिस्थितीत ते मोठ्या प्रमाणावर नोकरकपात करत आहेत.

अनेक कंपन्या नवीन कर्मचारी भरती करण्यासही टाळाटाळ करत आहेत. Trueup.io डेटानुसार, 2023 मध्ये एकूण 534 टेक कंपन्यांनी नोकरकपात जाहीर केली. त्यामुळे यावर्षी एकूण 1.53 लाख लोकांना रोजगार गमवावा लागला.

म्हणजेच दररोज एकूण 2,732 लोकांना नोकरीवरून काढण्यात आले आहे. दुसरीकडे, सन 2022 बद्दल बोलायचे तर त्या सालात एकूण 2.41 लाख टेक कामगारांना म्हणजे दररोज 1,535 लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले.

Layoffs
Customer Care Number: 'गुगल'वर एक चूक पडली महागात, बँकेतून 8.24 लाख रूपये उडाले, तुम्ही 'ही' चूक करत नाही ना?

फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटा, गुगल, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर आदी बड्या टेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कामावरून काढून टाकले आहे. मेटाने 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. तर गुगलने 12,000 म्हणजेच 6 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले.

याशिवाय अॅमेझॉनने 18,000 आणि Twitter ने निम्म्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता. याशिवाय डेलने 6,650 लोकांना कामावरून कमी केले. अलीकडे, मॅकिन्सेने 2,000 आणि टेलिकॉम कंपनी एरिक्सनने एकूण 8,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com