Pakistan: 'भारतासोबत संबंध सुधारणे गरजेचे...'- पाकिस्तानी पत्रकाराचा सरकारला इशारा

Pakistan: या सगळ्या पार्श्वभूमीवर एका वरिष्ठ पाकिस्तानी पत्रकाराने आपापसातले मतभेद दूर सारुन भारतासोबतचे संबंध चांगले करण्यावर पाकिस्तान सरकारने भर द्यावा असे म्हटले आहे.
Pakistan
PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan: भारत आणि पाकिस्तानमधले वाद संपुर्ण जगाला माहित आहेत. दहशतवाद, काश्मीरचा प्रश्न यावरुन भारत-पाकिस्तानमध्ये सतत आरोप-प्रत्यारोप सुरु असतात. काही दिवसांपूर्वीच भारताने पाकिस्तानला १९६० मध्ये झालेल्या सिंधू जल कराराबाबत नोटीस पाठवली होती.

सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. पाकिस्तानच्या नागरिकांना रोजच्या मुलभूत गरजा भागवण्यासाठी मोठ्या संघर्षाला तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांनी सरकारला याबाबत विनवण्यासुद्धा केल्या आहेत.

पाकिस्तान( Pakistan )मधील बलुचिस्तान भागातील नागरिकांनी आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी रस्त्यावर उतरत प्रशासनाविरोधी घोषणा दिल्या होत्या. त्याबरोबरच, भारता( India)त जाण्याची परवानगी द्यावी यासाठीसुद्धा मागणी केली होती.

दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर एका वरिष्ठ पाकिस्तानी पत्रकाराने आपापसातले मतभेद दूर सारुन भारतासोबतचे संबंध चांगले करण्यावर पाकिस्तान सरकारने भर द्यावा असे म्हटले आहे. पाकिस्तानी पत्रकार कामरान यूसुफच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानने काश्मीरच्या विवादावर लक्ष न देता देशाच्या आंतरिक प्रश्नावर लक्ष देणे गरजेचे आहे.

एका मुलाखतीत त्यांनी असेसुद्धा म्हटले आहे की,मी एक आर्टीकल लिहले आहे. त्यात मी असं म्हटले आहे की, सध्या पाकिस्तान ज्या राजकीय आणि आर्थिक संकटातून जात आहे अशावेळी शहबाज शरीफच्या सरकारने आपल्या आतंरिक मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

पाकिस्तानी नागरिकांना माझे हे म्हणणे पटत नसले तरी हेच सत्य आहे असेही युसुफ यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणतात,मागच्या दोन वर्षांपासून पाकिस्तान आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशात मौलिक सुधारणा करणे गरजेचे आहे.

Pakistan
Pakistan Currency: पाकिस्तान आणखी गाळात; डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण

सोबतच शेजारच्या देशांबरोबर शांती निर्माण करणे गरजेचे असल्याचेदेखील युसुफ यांनी म्हटले आहे. भारताबद्दल युसुफ यांनी म्हटले आहे की, भारत आर्थिकदृष्ट्या मजबूत होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. महासत्ता असलेल्या अमेरिके( USA )बरोबर भारताचे संबंध चांगले आहेत.

संरक्षण क्षेत्रात दोन्ही देशांची भागीदारी वाढत आहे. अशावेळी भारत पाकिस्तानपासून होणाऱ्या समस्यांपासून का चिंतीत असेल . याउलट पाकिस्तानला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानला शांततापूर्ण वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे असे पाकिस्तानी पत्रकार कामरान यूसुफ यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com