Indian Prisoners In Pakistani Jails: पाकिस्तान सरकारने मंगळवारी अटारी-वाघा सीमेवरुन दोन भारतीय कैद्यांची सुटका करुन त्यांना भारतात परत पाठवले. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, एका कैद्याने सांगितले की, सुमारे 700 भारतीय पाकिस्तानमध्ये त्यांची शिक्षा भोगत आहेत.
प्रोटोकॉल अधिकारी अरुण पाल यांच्या म्हणण्यानुसार, राजू पाच वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानात गेला होता. तर दुसरा कैदी गेम्ब्रा राम सुमारे अडीच वर्षे पाकिस्तानच्या (Pakistan) तुरुंगात होता.
एका मुलीचा पाठलाग करत पाकिस्तानची सीमा ओलांडली होती, असे गेम्ब्रा रामने सांगितले. तो म्हणाला की, 'मी एका मुलीचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानची सीमा ओलांडली. तिथे पोहोचल्यावर सहा महिने मला खूप छळले. सहा महिन्यांनंतर, मला दुसर्या तुरुंगात पाठवण्यात आले, जिथे मी 21 महिने घालवले.'
गेम्ब्रा राम पुढे म्हणाला की, 'मी ज्या तुरुंगातून आलो आहे, त्या तुरुंगात आणखी 700 भारतीय आहेत. ते वेडे झाले आहेत, खूप रडत आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दल मी सांगू शकत नाही.'
गेम्ब्रा रामने सरकारला (Government) विनंती केली की, सर्व भारतीयांना लवकरात लवकर बाहेर काढावे, कारण अनेक भारतीय कैदी तुरुंगात वेडे झाले आहेत. तिथे त्यांची अवस्था खूप दयनीय आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.