Samoa Political Crisis:पहिल्या महिला पंतप्रधानांना का घ्यावी लागली तंबूत शपथ?

Samoa
Samoa
Published on: 
Updated on: 

एपिया:Samoa Political Crisisपॅसिफिक सागरी प्रदेशातील समोआ(Samoa) या देशात राजकीय उलथापालथ होत आहे. इथल्या अलीकडील निवडणुकांनंतर देशाला पहिली महिला पंतप्रधान मिळाली आहे, मात्र सत्ता गमावल्याबद्दल नाराज असलेले विद्यमान पंतप्रधान ट्विलाएपा सैलेले मैलीलेगाओई(Tuilaepa Sailele Malielegaoi) यांनी पद सोडण्यास नकार दिला आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की देशाच्या प्रमुखपदी निवड झालेल्या नाओमी मताफा(Naomi Mataafa)  यांना संसदेच्या बाहेर तंबू टाकून शपथ घ्यावी लागली. वास्तविक, याचा निषेध म्हणून सत्ताधारी पक्षाने संसदेत टाळे ठोकले होते. तेव्हापासून देशात नेतृत्त्व संकट निर्माण झाले आहे.(Samoa first female prime minister sworn in in tent)

सामोआवर 40 वर्षे राज्य करणारे ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन पार्टी (HRPP) एप्रिलच्या निवडणुकीत मताफाच्या फास्ट(FAST) पक्षाने सत्तेवरून काढून टाकले होते. त्यानंतर सोमवारी जेव्हा नाओमी मताफा(Naomi Mataafa) या पदाच्या शपथविधी सोहळ्यास हजेरी लावण्यास पोहोचल्या तेव्हा त्यांना संसदेच्या आत जाण्याची परवानगी नव्हती, कारण सध्याच्या सत्ताधारी पक्षाने संसदेच्या गेट कुलूप लावून बंद केले होते. मात्र, या निषेधानंतरही मताफा यांनी आपल्या मंत्र्यांसोबत बाहेर तंबूत शपथ घेतली. येथे, मैलिलेगओई(Tuilaepa Sailele Malielegaoi) हा शपथ विधी सोहळा स्वीकारण्यास तयार नाही. त्यांनी त्यास अनधिकृत म्हटले आहे. 

माजी पंतप्रधानांनी संसद ताब्यात घेतली आणि ती लॉक केली. कोर्टाचा आदेश त्यांनी स्वीकारण्यास नकार दिला आहे. शपथ घेतील या आशेने 64 वर्षीय नाओमी मताफा सोमवारी संसदेत आल्या. यावेळी उपपंतप्रधान आणि देशाचे सरन्यायाधीशही संसदेत आले, पण जेव्हा त्यांनी संसदेत जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना तुईलेपाच्या सहकार्यांनी आधीच बंदिस्त केले असल्याचे आढळले. ज्यामुळे फिमी संसदेत आत जाऊ शकल्या नाही.

एचआरपीपी आणि फास्ट यांच्यात राजकीय गणित कसे होते ? देशात एक कठोर स्पर्धा होती. यावेळी, दोन्ही पक्षांनी 25-25 जागा नामांकित केल्या, परंतु त्यानंतर अपक्ष विजेत्याने फास्टला पाठिंबा दर्शविला. या निर्णयानंतर एचआरपीपीने सत्ता वाचविण्यासाठी कायद्याचा अवलंब केला आणि विरोधकांनी महिला खासदार कोट्याचे योग्यप्रकारे पालन केले नाही असे न्यायालयात सांगितले. याचा परिणाम असा झाला की देशातील निवडणूक आयोगाने एप्रिलमधील मतदान निकाल रद्द केला आणि 21 मे रोजी नवीन निवडणूक घोषित केली.

दरम्यान निवडणुकीच्या अवघ्या ५ दिवस आधी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एप्रिलची निवडणूक योग्य असल्याचे जाहीर केले. कोर्टाने एचआरपीपीविरोधात निकाल जाहीर केला आणि म्हटले की मताफाचा शपथविधी सोहळा झाला पाहिजे. विशेष बाब म्हणजे या निवडणुकीपूर्वी 22 वर्षे मैलिलेगाओईं यांनी देशावर राज्य केले. सामोआला 1962 साली न्यूझीलंडकडून स्वातंत्र्य मिळाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.