US Marriage Bill: समलिंगी विवाहाला मान्यता देणारे विधेयक कनिष्ठ सभागृहात मंजूर

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भपातावर अनपेक्षित निर्णय दिल्यानंतर समलिंगी विवाहाला मान्यता देणारे विधेयक कनिष्ठ सभागृहात मांडण्यात आले.
US Same-sex Marriage Bill
US Same-sex Marriage BillDainik Gomantak
Published on
Updated on

US Same-sex Marriage Bill: अमेरिकेत समलिंगी विवाहाला (Same Sex Marriage) मान्यता देणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या (US House Of Representatives) या निर्णयामुळे अमेरिकेतील समलिंगी समाजातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भपातावर अनपेक्षित निर्णय दिल्यानंतर समलिंगी विवाहाला मान्यता देणारे विधेयक कनिष्ठ सभागृहात मांडण्यात आले. ज्याला सभागृहाने मंजुरी दिली आहे. पुराणमतवादी न्यायाधीशांनीही समलिंगी विवाहाची मान्यता रद्द करावी अशी भीती असताना अमेरिकन कायदेकर्त्यांनी हे विधेयक मंजूर केले.

US Same-sex Marriage Bill
US Girl Gang Rape: अमेरिकेतील 21 वर्षीय पर्यटक महिलेवर पाकिस्तानमध्ये सामूहिक बलात्कार

'द हिल'च्या वृत्तानुसार, 'रिस्पेक्ट फॉर मॅरेज अॅक्ट' (Respect For Marriage Act Bill) विधेयक सहज मंजूर झाले. या विधेयकाच्या बाजूने डेमोक्रॅट्सनी 267 मते टाकली. दुसरीकडे रिपब्लिकन खासदारांनी विधेयकाच्या विरोधात 157 मतदान केले. अहवालानुसार, कनिष्ठ सभागृहात 47 रिपब्लिकन खासदारांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केले. त्याच वेळी, 7 रिपब्लिकन खासदारांनी मतदानात भाग घेतला नाही.

US Same-sex Marriage Bill
Recession: आर्थिक मंदीची चाहूल, जगप्रसिद्ध कंपन्यांची कर्मचारी भरतीत कपात

अमेरिकन सिनेटकडून मंजुरी मिळण्यात अडचण

हे विधेयक कनिष्ठ सभागृहात सहज मंजूर झाल्यानंतर आता ते सिनेटकडे मंजुरीसाठी पाठवले जाणार आहे. मात्र हे विधेयक सिनेटमध्ये मंजूर होण्यात अडचण येऊ शकते. कारण रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट या दोन्ही पक्षांचे सिनेटमध्ये 50 खासदार आहेत. 100 सदस्यीय सिनेटमध्ये डेमोक्रॅट्सकडे 50 जागा आहेत. सिनेटमध्ये हे विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांना रिपब्लिकन पक्षाची 10 मते मिळवावी लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com