Video: जीव वाचवण्यासाठी रशियन सैनिकाने हातात घेतले ग्रेनेड

सलग नऊ दिवसांपासून रशियाचे युक्रेनवरती हल्ले सुरू आहेत. रशियन सैन्य युक्रेनच्या रस्त्यावरती बॉम्ब, दारूगोळा घेऊन उतरले आहे.
Russian Soldier Viral Video
Russian Soldier Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

सलग नऊ दिवसांपासून रशियाचे युक्रेनवरती हल्ले सुरू आहेत. रशियन (Russia) सैन्य युक्रेनच्या (Ukraine) रस्त्यावरती बॉम्ब, दारूगोळा घेऊन उतरले आहे. अत्याधुनिक शस्त्रे आणि शक्तिशाली रणगाडे असूनही युक्रेनियन नागरिक मागे हटत नसल्याचे दृश्य दिसत आहे, तर ते नि:शस्त्र रशियन सैनिकांशी लढत आहेत. अनेक शहरांमध्ये रशियन सैनिकांना ओलीस ठेवले जात आहे आणि त्यांना परत कुठेतरी हाकलले जात आहे, आणि असेच एक दृश्य कोनोटॉप शहरात पाहायला मिळाले आहे. (Russian troops have landed on streets of Ukraine carrying bombs and ammunition)

येथे एक रशियन सैनिक संतप्त युक्रेनियन जमावाच्या भोवऱ्यात अडकला आणि त्याने आपला जीव वाचवण्यासाठी पूर्णपणे फिल्मी शैलीची पद्धत निवडली आहे. सोशल मीडियावरती (Social Media) व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये युक्रेनचे लोक त्या सैनिकाला आत्मसमर्पण करण्यास सांगत आहेत. त्याचवेळी ते ‘शेम-शेम’ अशा घोषणाही देताना दिसत ​​आहेत. पण शरणागती पत्करण्याऐवजी रशियन सैनिक आपल्याजवळ ठेवलेला हँडग्रेनेड दोन्ही हातात घेतो आणि गर्दीतून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी जागा बनवतो असं ह्या व्हिडीओ मध्ये दिसून येत आहे.

धोका आहे तरी लढा

जीवाला धोका असतानाही युक्रेनचे लोक मॉस्कोच्या या सैनिकाला सामोरे जात असल्याचे आपल्याला दिसत आहे. त्यामधील एक व्यक्ती म्हणतो, 'तुमचा ग्रेनेड बाहेर काढून चालत जाऊ नका.' काही लोक ग्रेनेडच्या धोक्याकडे दुर्लक्ष करून त्याच्याशी लढण्याचा प्रयत्न करत आहेत. हे प्रकरण युक्रेनच्या दक्षिण किनारी शहराजवळील आहे.

लढा नाहीतर शरण जा

या रशियन सैनिकाने कोनोटॉपचे महापौर आर्टेम सेमेनिखिन यांच्याशी फोनवरती संवाद साधला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सैनिकाने महापौरांना एकतर आत्मसमर्पण करा किंवा लढा असा अल्टिमेटम दिला आहे. हा सैनिक निघून गेल्यावर महापौरांनी तेथे उभ्या असलेल्या जमावाला दोन्ही पर्यायांबाबत सांगितले आणि विचारले तुम्हाला काय हवं आहे? त्यावरती युक्रेनियन लोकांनी उत्तर दिले, 'युद्ध'.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com