Russia-News: रशियातील वॅगनर ग्रुपच्या बंडानंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. दरम्यान, रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाई पात्रुशेव यांनी बुधवारी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांच्याशी चर्चा केली. निकोलाई यांनी डोभाल यांना रशियातील ताज्या घडामोडींची माहिती दिली.
भारत आणि रशियाच्या दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा अशा वेळी झाली, जेव्हा काही दिवसांपूर्वी रशियाला वॅगनर ग्रुप या खासगी लष्करी गटाच्या बंडखोरीला सामोरे जावे लागले होते. रशियाच्या (Russia) निवेदनानुसार, पात्रुशेव यांनी डोभाल यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.
यावेळी त्यांनी डोभाल यांना रशियामधील ताज्या घडामोडींची माहिती दिली. निवेदनानुसार, "द्विपक्षीय आणि बहुपक्षीय स्वरुपाच्या चौकटीत, सुरक्षा क्षेत्रातील रशिया-भारत सहकार्याशी संबंधित सद्य समस्या आणि त्याच्या संभाव्यतेच्या शक्यतांवर चर्चा करण्यात आली."
याशिवाय, एन पात्रुशेव यांनी डोभाल यांना रशियातील ताज्या घडामोडींची माहिती दिली. विशेष म्हणजे, येवगेनी प्रिगोझिन यांच्या नेतृत्वाखालील वॅगनर ग्रपने गेल्या शनिवारी बंड केले आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आव्हान दिले.
तथापि, जेव्हा त्यांचे सैन्य मॉस्कोपासून केवळ 200 किलोमीटर (120 मैल) दूर होते, तेव्हा प्रीगोझिनने आपले सैनिक मागे घेण्याचा निर्णय घेतला. प्रिगोझिनने अचानक क्रेमलिनशी करार केल्यानंतर माघार घेण्याचा आपला इरादा जाहीर केला.
वॅगनर ग्रुपने पुतीन यांना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. वॅगनर ग्रुपने युक्रेनविरुद्ध (Ukraine) युद्ध लढण्यास नकार दिला आहे. प्रीगोझिनच्या नेतृत्वाखाली वॅग्नरच्या सैन्याने गेल्या आठवड्यात रशियाचे दक्षिणेकडील शहर रोस्तोव ताब्यात घेतले होते.
त्यानंतर पुतिन यांची सत्ता उलथून टाकली जाईल, असे बोलले जात होते. त्यानंतर खुद्द पुतीन यांनाच स्पष्टीकरण देण्यासाठी पुढे यावे लागले. गद्दारांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.