रशियन अध्यक्षांच स्टेरॉईडचं सेवन झालं जास्त; हेच युक्रेनवरील हल्ल्याचं कारण?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यावर स्टेरॉईड घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Vladimir Putin
Vladimir PutinDainik Gomantak
Published on
Updated on

Russia-Ukraine War: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर स्टेरॉईड घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्टिरॉइडबद्दल सांगण्यात येते की, याचे सेवन करणारी व्यक्ती अधिक आक्रमक होते. ब्रिटनचे माजी परराष्ट्र सचिव लॉर्ड डेव्हिड ओवेन यांनी म्हटले की, पुतिन (Vladimir Putin) यांच्या चेहऱ्याच्या आकारात बदल झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर स्टेरॉईड्सचे सेवन केल्याचा संशय अधिक बळावतो. स्टेरॉईडच्या अतिसेवनामुळे चेहऱ्यामध्ये बदल होतो. रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष खूपच आक्रमक झाले आहेत. त्यांचे अनेकदा आक्रमक फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये ते शिकार करताना दिसत आहेत. (Russian President Putin aggressive over eating steroids)

दरम्यान, लॉर्ड ओवेन यांनी टाईम्स रेडिओला बोलताना सांगितले की, 'त्यांच्या चेहऱ्याकडे बघा, तो कसा बदलला आहे. आता त्यांचा चेहरा थोडा गोलाकार झाला आहे. प्लास्टिक सर्जरी किंवा बोटॉक्समुळे असा झाल्याचे लोकांचे म्हणणे आहे. मात्र माझा या गोष्टींवर विश्वास नाही.''

Vladimir Putin
Russia-Ukraine War: आता रशिया करणार 'या' शस्त्राद्वारे जमिनीवर हल्ला

ते पुढे म्हणाले, ''एकतर ते बॉडीबिल्डरप्रमाणे अ‍ॅनाबॉलिक स्टिरॉइड्स घेत असतील किंवा कॉर्टिकोस्टेरॉईडचा वापर करत असतील. जर तुम्ही अशा औषधांचे सेवन करत असाल तर तुमच्यासोबतही असेच काहीसे घडते. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि त्यातून कोरोनाचा धोका वाढतो.'

Vladimir Putin
Russia-Ukraine War: आता रशिया करणार 'या' शस्त्राद्वारे जमिनीवर हल्ला

लॉर्ड ओवेन यांनी पुढे असेही म्हटले की, 'ही व्यक्ती पूर्णपणे एकांतात राहते, जे खूपच विलक्षण आहे.

Vladimir Putin
Russia-Ukraine War: युक्रेननं चर्चेचा प्रस्ताव फेटाळला

त्यावर लॉर्ड ओवेन म्हणाले की, 'अ‍ॅनाबॉलिक स्टिरॉइड्स लोकांमध्ये आक्रमकता वाढवतात. ही माहिती अशा वेळी आली आहे जेव्हा कोरोना महामारीमुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची मानसिक स्थिती बिघडल्याचे बोलले जात आहे. यामुळे त्यांनी युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या दोन वर्षात त्यांना फार कमी लोक भेटले आहेत. काही काळ एकांतात घालवल्यानंतरच लोकांना पुतिन यांना भेटण्याची परवानगी मिळते.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com