Russia: मूर्खपणाचा कळस! लहान बाळाला अन्न म्हणून दिला फक्त सूर्यप्रकाश, अखेर चिमुकल्याने प्राण सोडला

या जोडप्याचा असा विश्वास होता की सूर्यप्रकाश हा अन्न स्रोत आहे, म्हणजेच फक्त सूर्यप्रकाशात राहिल्याने माणसाचे पोट भरू शकते.
Russia
RussiaDainik Gomantak
Published on
Updated on

Russia: अनेक लोकांचा मूर्खपणा त्यांच्या कुटुंबासाठी आणि मुलांसाठी प्राणघातक ठरतो. सोशल मीडियात प्रसिद्ध असेलल्या एका जोडप्यानेही असाच एक मूर्खपणा केल्यामुळे त्यांच्या एका महिन्याच्या मुलाचा जीव गेला आहे.

या जोडप्याचा असा विश्वास होता की सूर्यप्रकाश हा अन्न स्रोत आहे, म्हणजेच फक्त सूर्यप्रकाशात राहिल्याने माणसाचे पोट भरू शकते. यामुळे त्यांनी आपल्या मुलाला अन्न देणे बंद केले आणि शेवटी उपासमारीने मुलाचा मृत्यू झाला.

ऑक्साना मिरोनोव्हा (33) आणि मॅक्सिम ल्युटी (43) यांना त्यांच्याच मुलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. सूर्यप्रकाश घेतल्याने शरीराला ऊर्जा मिळून पोट भरते, असा विश्वास दोघांचाही होता. रॅडिकल रॉ फूडिस्ट लुटी आणि त्यांची पत्नी मिरोनोव्हा द लिव्हिंग मॅन नावाचा क्लब चालवतात, असे तपासात उघड झाले आहे.

द सनच्या वृत्तानुसार, या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर न्यायालयाने मिरोनोव्हाला दोन महिन्यांसाठी नजरकैदेत ठेवले आहे. तपासणीत मुलाला भूकेमुळे न्यूमोनिया झाल्याची माहिती समोर आली. रशियातील सोची रुग्णालयात मुलाचा मृत्यू झाल्यानंतर रशियन तपास समितीने या दाम्पत्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

Russia
Bilawal Bhutto: पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री गोव्यात येणार; 'या' तारखेला SCO ची बैठक

स्थानिक मीडियानुसार, खाण्या-पिण्याबद्दलच्या त्याच्या विचित्र विश्वासामुळे, लुटे आपल्या मुलाला सूर्यप्रकाशाशिवाय अन्न किंवा पाणी देऊ नये याची काळजी घेत असे. हेच मुलाच्या मृत्यूचे कारण ठरले. झ्वेझदा न्यूजने सांगितले की मुलाचा मृत्यू "अत्यंत थकवा, भूक आणि न्यूमोनिया" मुळे झाला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

एखाद्या पालकाने आपल्या मुलावर अत्याचार केल्याची ही पहिलीच घटना नाही. नुकतेच ब्रिटनमधून एक प्रकरण समोर आले आहे.

शॅनन मार्सडेन आणि स्टीफन बोडेन दोघेही त्यांच्या 10 महिन्यांच्या बाळाचा छळ केल्याबद्दल दोषी आढळले. फिनले यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणले असता त्यांच्या शरीरावर एकूण 71 गंभीर जखमा होत्या. याशिवाय सुमारे 57 फ्रॅक्चर होते. फिनले बोडेन नावाच्या या मुलाच्या पालकांनी आपल्यावर केलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीशही रडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com