क्वाड बैठकीवेळीच जपानच्या सीमेवर चीन-रशियाची लढाऊ विमाने

अमेरिका, जपान, भारत, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांच्या बैठका सुरू असताना हा संपुर्ण प्रकार घडला आहे.
Quad Summit
Quad SummitTwitter
Published on
Updated on

बीजिंग: एकीकडे जपानमध्ये क्वाड समिटचे आयोजन केले जात होते तर दुसरी कडे रशिया आणि चीनने युद्ध सराव करून खळबळ निर्माण केली आहे. रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, रशीया आणि चीनच्या सैन्याने 13 तास सराव केला. जपानी समुद्र आणि पूर्व चीन समुद्रात ही संयुक्त गस्त घालण्यात आली. रशियाची TU-95 बॉम्बर आणि चीनची Xian H-6 जेट विमाने सहभागी झाली होती. या युक्तीवादावर तीव्र प्रतिक्रिया देताना जपानने चिथावणी देण्याचा प्रयत्न केला असे या कृतीचे वर्णन केले. आणि अमेरिकेने यावरून रशिया आणि चीन एकमेकांच्या किती जवळ आले आहेत हे दिसून आले, असे म्हटले. (Quad Summit)

रशिया पाठोपाठ जपानची विमाने आली आणि एकच खळबळ उडाली, रशियन आणि चिनी सैन्याची विमाने त्यांच्या सीमेजवळ उडताना पाहून दक्षिण कोरिया आणि जपानच्या विमानांनीही उड्डाण घेतले आणि निरीक्षण केले. आमच्या हवाई क्षेत्राजवळ चीन आणि रशियाची युद्ध विमाने पाहून आम्ही आमची विमाने तैनात केली आहेत, असे जपानचे संरक्षण मंत्री नोबुओ किशी म्हणाले. टोकियोमध्ये क्वाड कंट्रीज समिट सुरू असताना हा प्रकार घडला.

Quad Summit
श्रीलंकेने भारताकडे पुन्हा मागितली 500 दशलक्ष डॉलरची मदत

प्रसारमाध्यमांशी बोलताना किशी यांनी सांगितले की, टोकियोने राजनयिक माध्यमातून या मुद्द्यावर रशिया आणि चीनकडे आपला विरोध व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचित नेते अँथनी अल्बानीज यांची टोकियोमध्ये बैठक होत असताना रशिया आणि चीनने हे सर्व जाणूनबुजून केल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट होते.

जपान म्हणाला- ही चिथावणी देणारी कृती

जपानने म्हटले की ही चिथावणीखोर कृती आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासूनची ही चौथी घटना आहे. दरम्यान, चीनच्या संरक्षण मंत्रालयाने जपानी समुद्र आणि पूर्व चीन समुद्रात संयुक्त हवाई गस्तीला पुष्टी दिली आहे. हा वार्षिक सराव असल्याचे चीनने म्हटले आहे. अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील ही पहिली लष्करी कवायत होती, परंतु बायडेन जपानला भेट देत असताना ही घडवून आणली त्यामुळे मोठी खळबळ उडाली.

Quad Summit
उत्तर कोरियाने पुन्हा लॉन्च केले क्षेपणास्त्र, दक्षिण कोरियाने दिला इशारा

अमेरिका, जपान, भारत, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांच्या बैठका सुरू असताना हा संपुर्ण प्रकार घडला आहे. अशा स्थितीत या डावपेचाकडे थेट आव्हान म्हणून पाहिले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com